भारताची राष्ट्रभाषा हिंदी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये 4 थ्या क्रमांकावर आहे. यामुळे या भाषेचा मान राखण्याप्रती आणि याचा गौरव करण्यासाठी भारतात 14 सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या सावट असल्यामुळे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना या दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.