Rajnikaanth (PTI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या 'एक देश एक भाषा' या विधानामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाद सुरू आहे. या वादात सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikant) यांनीदेखील उडी घेतली आहे. केवळ तामिळनाडूतच (Tamilnadu) नव्हे तर, देशातील कोणत्याही दक्षिणेकडील राज्यात जबरदस्तीने हिंदी लादली जाऊ नये, असे सांगून रजनीकांत यांनी अमित शहांच्या विधानाला विरोध दर्शविला आहे. याआधी रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा यांच्याकडून अनुच्छेद 370 (Artical 370) संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले होते.

अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने 'एक देश एक भाषा' या मुद्द्यावर भाषण केले होते. परंतु, अमित शहा यांच्या या विधानावर दक्षिण राज्यातील नागरिकांनी नाराजी वक्त केली होती. यातच आता अभिनेता रजनीकांत यांची भर पडली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, "केवळ तामिळनाडूच नव्हे, तर दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात हिंदी लादली जाऊ नये. येथे कोणीही हिंदी स्वीकारणार नाही." ते पुढे म्हणाले की, "फक्त हिंदीच नाही तर, येथे कोणतीही भाषा वापरली जाऊ नये. देशाच्या एकता आणि विकासासाठी एक समान भाषा असणे चांगली गोष्ट आहे. परंतु, हिंदी भाषाची सक्ती करणे अयोग्य आहे. हे देखील वाचा-नांदेड जिल्ह्यातील पाच गावांची तेलंगणा राज्यात विलीनीकरणाची मागणी; आंदोलनाचा सुद्धा दिला इशारा.

ANI चे ट्वीट-

याआधी रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कौतुक केले होते. रजनीकांत म्हणाले की, काश्मीर हा एक मोठा मुद्दा आहे. तसेच देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. महत्वाचे म्हणजे, राजकीय नेत्यांनी कोणत्या मुद्द्याचे राजकारण केले पाहिजे? आणि कोणाता मुद्दा राजकारणातून वगळला पाहीजे, यामधील फरक त्यांनी समजून घेतला पाहिजे.