Hindi Diwas 2020: हिंदी दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सकाळी 10.30 वाजता देशवासियांना करणार संबोधित
Amit Shah (Photo Credits: ANI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) 14 सप्टेंबर (14 September) हिंदी दिनाचे (Hindi Diwas) औचित्य साधत देशवासियांना संबोधित करणार आहेत. यासाठी गृहमंत्रालयाकडून एक प्रेस रिलीज जारी करण्यात आले आहे. या प्रेस रिलीजमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हिंदी दिनानिमित्त उद्या (सोमवार, 14 सप्टेंबर) रोजी देशवासियांना संबोधित करतील. याचे प्रसारण दूरदर्शनच्या नॅशनल वाहिनीवर (Doordarshan National channel) सकाळी 10.30 वाजता होईल. (Hindi Diwas 2020: ‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार)

संविधान सभेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी ला राज्यभाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्त्वपूर्ण दिवसानिमित्त राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे केंद्र सरकारच्या कार्यालयात, मंत्रालयात, उपक्रमात, बँकेत इत्यादी ठिकाणी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राजभाषा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसंच विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. दरम्यान यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे हिंदी दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नाही, असे गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीज मध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार, 258 मिलियन भारतीयांची मूळ भाषा हिंदी होती. (Amit Shah Admitted to AIIMS Again: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची प्रकृती बिघडली, पुन्हा एकदा 'एम्स' रुग्णालयात दाखल)

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने काल (12 सप्टेंबर) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  2 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर 14 ऑगस्ट रोजी त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र व्हायरल इंफेक्शनमुळे 18 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील 2 दिवसांतच संसदीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे फुल बॉडी चेकअप साठी अमित शाह रुग्णालयात दाखल झाले असल्याचा अंदाज आहे.