Amit Shah Admitted to AIIMS Again: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची प्रकृती बिघडली, पुन्हा एकदा 'एम्स' रुग्णालयात दाखल
गृह मंत्री अमित शाह (Photo Credits: PTI)

Amit Shah Admitted to AIIMS Again: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची प्रकृती शनिवारी रात्री बिघडली. त्यामुळे त्यांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील अखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमित शाह यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता.

अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यात शाह यांना तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2 ऑगस्टला अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. सुमारे 10 ते 12 दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर अमित शाह यांनी स्वत: यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली होती. (हेही वाचा - Shripad Naik Health Update: केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक महिन्याभराच्या उपचारानंतर कोरोनामुक्त; पणजीच्या हॉस्पिटल मधून सुट्टी)

दरम्यान, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणं दिसल्याने अमित शाहा यांना पुन्हा एकदा 18 ऑगस्टला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह यांना 31 ऑगस्टला घरी सोडण्यात आलं होतं. शनिवारी रात्री पुन्हा एकदा त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्या कारणाने एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृची स्थिर आहे, असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.