भारताचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक (Union AYUSH Minister Shripad Naik ) यांनी आज (12 सप्टेंबर) कोविड 19 (COVID 19) वर मात केली आहे. बरोबर महिन्याभर उपचारानंतर श्रीपाद नाईक यांची कोरोना विरूद्धची लढाई यशस्वी ठरली आहे. दरम्यान 67 वर्षीय श्रीपाद नाईक यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांची हॉस्पिटलमधून सुटका झाली आहे.
श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्याचे भाजपा खासदार आहेत. 12 ऑगस्ट दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातीला सौम्य लक्षणं असल्याने त्यांनी होम क्वारंटीनचा पर्याय निवडला होता. मात्र नंतर ताप आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना श्वसनाला त्रास होत असल्याने एम्सची टीम गोव्यात त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी दाखल झाली होती. मात्र त्यांची स्थिती नियंत्रणात असल्याने दिल्लीऐवजी गोव्यातच त्यांच्यावर पुढील उपचार झाले.
ANI Tweet
Goa: Union AYUSH Minister Shripad Naik discharged from hospital in Panaji today after being admitted for #COVID19, for a month. pic.twitter.com/sX7a5HAzrL
— ANI (@ANI) September 12, 2020
ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये श्रीपाद नाईक यांची प्रकृती ढासळली होती. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी 'श्रीपाद जी मृत्यूच्या दारातून परत आले आहेत.' अशा शब्दांत त्यांचे हेल्थ अपडेट्स दिले होते. दरम्यान श्रीपाद नाईक यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये झपाट्याने घट झाली होती. श्रीपाद नाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली होती.
श्रीपाद नाईक मोदी सरकारमध्ये आयुष मंत्रालयाचा कारभार पाहतात. सोबतच त्यांच्यावर संरक्षण खात्याच्या राज्यमंत्री पदाची देखील जबाबदारी आहे. गोव्यात सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.