Hindi Diwas 2020 (PC - File Image)

Hindi Diwas 2020: हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. 14 सप्टेंबर 1949, ला भारताने त्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा अवलंब केला होता. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधत,चित्रपट विभागातर्फे संशोधित माहितीपट प्रसारित करून 14 सप्टेंबर 2020 रोजी ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण आठवडा www.filmsdivision.org/Documentary आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर हिंदीतील 5 चित्रपट विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या मातृभाषाबद्दल जागरूक करणे हा आहे. हिंदी दिवसाचा इतिहास खूप जुना आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या दिवशी हिंदी भाषेला राजभाषा बनविण्यात आले. हिंदी भाषा होण्यासाठी प्रसिद्ध हिंदी विद्वान लेखक व्योहार राजेंद्र सिंहा यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या दिवशीच भारतीय राज्यघटनेने भारतीय संविधान संघटनेची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला. (हेही वाचा - Hindi Diwas: भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो? या दिवसाच्या सेलिब्रेशन बाबत '8' इंटरेस्टिंग गोष्टी)

दरम्यान, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 343 नुसार देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले गेले. आज हिंदी ही जगातील मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा असून 520 दशलक्षाहून अधिक लोकांची प्रथम भाषा आहे.