शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी उद्या 11 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पत्राचाळ जमीन गैरव्यवहारामध्ये एफएसआय विकून काही पैसे मिळवून त्यावर कर्ज घेतल्याचे आरोप राऊत कुटुंबावर आहे.