वर्धा येथील दत्ता मेघे वैद्यकिय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरोडा गोरगाव येथील भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश होता. सर्व विद्यार्थी परीक्षा झाल्यामुळे पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला.