एनसीपी नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आर्थर रोड तुरूंगातून सुटका झाल्यानंतर 1-2 दिवसांपूर्वी पहिल्यांदाच नागपूरात आगमन झाले. वर्धा मध्ये बोलताना अनिल देशमुख यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी आपला कारागृहात छळ झाला असेही सांगितले. सोबतच आपल्याला काही तडजोडी करण्याचा देखील पर्याय दिला होता. जर तो समझोता झाला असता तर महाविकास आघाडी सरकार यापूर्वीच कोसळलं असतं असं ते म्हणाले आहेत.
वर्धा मध्ये सभेला संबोधित करताना एनसीपी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान आपण 14 महिने खोट्या आरोपांखाली जेल मध्ये होतो असे देखील ते म्हणाले आहेत. राज्य सरकारवर टीका करत त्यांनी शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार ईडीच्या भीतीने दुसऱ्या गटात पळून गेले असल्याचा आरोप केला आहे. नक्की वाचा: Sanjay Raut On Nana Patole: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळेच 'मविआ' सरकार पाडण्याची संधी मिळाली - संजय राऊत .
पहा ट्वीट
#WATCH | "You all know I was kept in jail for 14 months under false allegations.I had received an offer for a deal. Had I accepted, I wouldn't have been in jail. Govt (MVA) would've toppled even before 2.5 yrs,but I didn't go for settlement," says NCP leader Anil Deshmukh (12.02) pic.twitter.com/jG1z7XQYq5
— ANI (@ANI) February 13, 2023
अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकार मध्ये गृहमंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्ट्राचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई करत त्यांना जेलमध्ये टाकले होते. डिसेंबर महिन्यात देशमुखांची जामीनावर सुटका झालेली आहे.