Vande Mataram: आजपासून वंदे मातरम् अभियानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला उद्घाटन सोहळा
Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

वर्धा (Wardha) या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) कर्मभूमीत आज गांधी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात आज हॅलो ऐवजी "वंदे मातरम्" (Vande Mataram) या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी झालेल्या जनसभेत "हॅलो ऐवजी वंदे मातरम्" या अभियानाची पार्श्वभूमी सांगण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) राबवण्यात येणारा हा अनोखा उपक्रम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वर्धा येथे "वंदे मातरम" मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 'वंदे मातरम् परत आपल्याला आपल्याला व्यवहारात आणायचे आहे. हॅलो ऐवजी वंदे मातरम् असा वापर करून गुलामगिरीच्या निशाणी पुसून टाकायच्या आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे मातरम् मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

 

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काहींना प्रश्न पडला असेल जर आम्हाला जय महाराष्ट्र (Jai Maharashtra), जय भवानी (Jai Bhavani), जय भीम (Jai Bheem) किंवा जय श्री राम (Jai Shree Ram) म्हणायचे असेल तर काय. तर त्यांना तसे ही बोलता येणार. कोणाला आई वडिलांचा नाव घ्यायचे असेल तरी चालेल, मात्र हॅलो (Hello) बोलू नका. वंदे मातरम आपण सर्वांना प्राण प्रिय आहे. जर ते प्राण प्रिय असेल तर वंदे मातरम् म्हणा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (हे ही वाचा:- Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क)

 

"हॅलो ऐवजी वंदे मातरम्" या मोहिमेच्या शुभारंभा बरोबरोबर आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाचा (Wardha Collector Office) उद्घाटन सोहळा देखील पार पडला. तसेच वर्धा जिल्हा विशेष पुरवणी दर्शनिकेचे (गॅझेटियर) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळातील जिल्ह्याच्या प्रगतीची सांखिकी तसेच अन्य माहिती यात संकलित केलेली आहे.