गेल्या 2 दिवसांपासून विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला आहे. अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील  बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video))

पाहा पोस्ट -

पूर्व विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हे धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे धरण असुन तेही आता तुडुंब भरले आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शुक्रवारला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढलेली आहे. वर्ग खोल्यात गुडघाभर पाणी साचून सर्व साहित्याची नासधूस झालेली आहे. तसेच या पाण्यात भिजून शालेय पोषण आहाराचे साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठे मार्ग तर 10 लहान मार्ग असे एकूण 13 मार्ग वाहतूक साठी बंद झाले आहेत.