Wardha Bus accident

Wardha Accident: वर्धा (Wardha) जिल्ह्यात हिंगणघाट येथील नागपूर हैद्राबाद महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटली. या अपघातात या १ प्रवाशी ठार तर ८ जण जखमी झाले आहे. ही घटना जिल्ह्यातील आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ आज पहाटे ५च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघातात मृत्यूमुखी पडलेलल्या तसेच जखमी नागरिकांचे ओळख अद्यापही समजू शकली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, हैद्राबाय येथून एक खासगी बस नागपूर हैद्राबादच्या मार्गाने जात होती, बस मध्ये मिळालेल्या माहितीनुसार २८ प्रवाशी होते. रस्त्यावर खड्डा चुकवताना बसवरिली नियत्रंण सुटल्याने बसचा अपघात झाला आणि बस पलटली. ही भरधाव वेगात हिंगणघाटात जात होती. बस पलटल्यामुळे बस मधील प्रवाशी देखील बसच्या खाली आले. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहे. बसचे देखील भरपूर नुकसान झाले आहे.

अपघात घटल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड केला. स्थानिकांना बस अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना देखील घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस क्रेनच्या साह्याने बाजूला करत येथील वाहतूक सुरुळीत केली. पुढील तापस हिंगणघाट पोलीस करत आहेत.