महाराष्ट्रात प्राण्यावरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील वर्धा (Wardha) येथे तुळशीदास डेलीकर नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर गायीवर बलात्कार (Rape on Cow) केल्याचा आरोप आहे. पेशाने सफाई कामगार असलेल्या या व्यक्तीने अनेक गायींसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही, त्याचे गायीसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याला अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याने एक-दोन नव्हे तर अनेक गायींवर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे.

गायीसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी आंदोलन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तुलसीदासला अटक केली. याप्रकरणी फिर्यादी प्रदीप तलमले यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. हे प्रकरण वर्धा शहरातील हवालदारपुरा इथले आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, हा माणूस जुन्या सरकारी टॉयलेट ब्लॉकजवळ कचरा डंपिंग साइटच्या आसपास गायींसोबत लैंगिक संबंध ठेवत असे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी डेलीकर हा कर्करोगाचा रुग्ण आहे. डेलीकर हा मानसिक आजारी असल्याचा दावाही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे, मात्र त्यांनी अद्याप याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तलमले यांनी दावा केला की त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने 13 जुलैचे काही व्हिडिओ आणि 14 जुलैची छायाचित्रे शेअर केली होती, ज्यामध्ये डेलीकर दोन वेगवेगळ्या गायींसोबत घृणास्पद कृत्य करताना दिसत होता.

एसपी नूरुल हसन यांनी सांगितले की, माहिती शेअर केल्यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. हसन म्हणाले, 'आम्ही आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक आरोप लावले आहेत आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत.' वर्धा पोलीस ठाण्याचे प्रभारी सत्यवीर बंडीवार यांनी सांगितले की, आरोपीची वैद्यकीय तपासणी महत्त्वाची ठरेल. (हेही वाचा: Wardha Shocker: वर्ध्यात धकादायक प्रकार तरुणीच्या अंगावर फेकलं अॅसिड युक्त द्रव, आरोपी पोलीसांच्या ताब्यात)

बंडवीर पुढे म्हणाले की, व्हिडिओ आणि चित्रे आधीपासूनच सोशल मीडियावर आहेत आणि डेलीकर याच्यावर तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या या कृतीमुळे कामगारांचा एक भाग संतप्त झाला. तपास पथक आता पुरावे गोळा करण्यात गुंतले आहे. आरोपींनी ज्या गायींसोबत शरीरसंबंध ठेवले, त्यांचाही शोध सुरू असल्याचे बंडीवार यांनी सांगितले.