रेडमी वाय3 (Redmi Y3) हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. यासोबतच कंपनीचा नवा रेडमी 7 (Redmi 7) स्मार्टफोन देखील लॉन्च होणार आहे. रेडमी वाय 3 स्मार्टफोन कंपनी 32 मेगापिक्सलच्या सुपर सेल्फी कॅमेरा, वॉटर ड्रॉप नॉच आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप सह लॉन्च करेल. तर दुसरीकडे रेडमी 7 स्मार्टफोन कंपनी लो बजेटमध्ये लॉन्च करत आहे. या फोनची बॅटरी 4000 एमएएच असून स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर सह यात मीयूआय 10 सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.
रेडमी वाय3 स्मार्टफोन आणि किंमत
रेडमी वाय सिरीजअंतर्गत भारतात शाओमीने रेडमी वाय 2 हा स्मार्टफोन 9,999 रुपये किंमतीत लॉन्च केला होता. तर रेडमी वाय1 स्मार्टफोन 8,999 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये वाटर ड्रॉप नॉच, ड्युअल रिअर कॅमेरा, रिअर फिंगरप्रिंट सेंसर, 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
रेडमी 7 फिचर्स आणि किंमत
रेडमी 7 स्मार्टफोनची किंमत सुमारे 7100 रुपये आहे. ही किंमत 2 जीबी रॅम 16 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 8200 रुपये होते. या स्मार्टफोन्समध्ये 6.26 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 2, 3 आणि 4 जीबी रॅमच्या पर्यांयासह उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एआय स्मार्ट ब्युटी, सेल्फी टायमर आणि फेस अनलॉक इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 4 जी वोएलटीई, वायफाय, ब्लूटुथ, जीपीएस, आयआर ब्लास्टर आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकसह येईल. यात 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.