Redmi Note 7S लवकरच होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स
Redmi (Photo Credit- File Photo)

चीनी (China) स्मार्टफोन कंपनी शओमी (Xiaomi) येत्या 20 मे रोजी Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनसाठी 48 मेगापिक्सल कॅमेरा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनपेक्षा या स्मार्टफोनची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेडमी नोट 7 एस स्मार्टफोनचा फोटो सोशल मीडियात झळकवण्यात आला होता. त्याचसोबत रेडमी त्यांच्या फ्लॅगशिपमधील K20 सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(OnePlus 7 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च; पाहा किंमत फिचर्स आणि बरंच काही)

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snpadragon 855 प्रोसेसर दिला जाणार आहे. तर One Pluse 7 Pro ला टक्कर देणार हा स्मार्टफोन असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.