OnePlus 7 Pro | (Photo Credit: OnePlus website)

वनप्लस (OnePlus) या स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनीने आपले फ्लॅगशिप OnePlus 7 Pro आणि OnePlus 7 हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. बंगळुरु येथे आयोजित वना कार्यक्रमात हे दोन्ही फोन कंपनीने मंगळवारी (14 एप्रिल 2019) लॉन्च केले. दोन्ही फोनमध्ये दमदार प्रोसेसर आणि कॅमेरा दिला आहे. वनप्लस कंपनीने OnePlus 7 Pro आणि OnePlus 7 स्मार्टफोनसोबत आपला ब्लूटूथ हेडफओनही दिलाआहे. काय आहेत या दोन्ही फोनची किंमत काय आहेत फिचर्स घ्या जाणून..

OnePlus 7 Pro स्पेशिफिकेशन्स

या फोनच्या स्पेशिफिकेशनबद्दल बोलायचे तर, OnePlus 7 Pro हा फोन अॅण्ड्रॉईड प्रणाली 9.0 वर आधारीत आहे. हा फोन  OxygenOS उपलब्ध असेन. OnePlus 7 Pro मध्ये 6.67 इंचाचा फ्लूइड एमोलेड डिस्प्लेही मिळणार आङे. ज्याचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. प्रोसेसरबाबत सांगायचे तर वनप्लस 7 मध्ये क्वालकॉमचे स्नैपड्रॅगन 855 प्रोसेसर आहे. ज्यात ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 640 जीपीयू आणि 12 जीबी पर्यंत रॅम मिळणार आहे. या फोनमध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज क्षमता आहे.

रिअर पॅनल 3 कॅमेरे

OnePlus 7 Pro मध्ये रिअर पॅनल 3 कॅमेरे आहेत. यातील वन 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेन्सर वाला प्रायमरी कॅमेरा आहे. याचा अपार्चर f/1.6 आहे. कॅमेऱ्यासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन इमेज स्टेबलाइजेशन दोन्ही मिळणार आहेत. फोनमध्ये दुसरा कॅमेरा 16 मेगापिक्सल f/2.4 अपर्चर वाला अल्ट्रा वाइड एंगल आणि तिसरा कॅमरा 8 मेगापिक्सल चाटेलीफोटोयुक्त आहे. ज्यासोबत 3x ऑप्टिकल झूम मिळणार आहे. रिअर कॅमेऱ्यासोबत ड्युअल एलईडी फ्लॅश लाईट मिळेल आणि 4 के व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऑप्शनही उपलब्ध असेन. फ्रंड कॅमेऱ्याबाब सांगायचे तर यात 16 मेगापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. ज्यात सोनी IMX471 सेन्सर आहे. कंपनीचा दावा आङे की, 5 वर्षांपर्यंत कॅमेऱ्याला लाहीच अडचण येणार नाही. (हेही वाचा, 14 लाख किंमतीच्या या आयपॉडमध्ये काय आहे विशेष?)

OnePlus 7 Pro इतर फिचर्स

  • 4000 एमएएच बॅटरी ,फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • कनेक्टीवीटी - 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, NFC, GPS/A-GPS,
  • यूएसबी टाइप-सी पोर्ट
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
  • डॉल्बी अॅटम ऑडियो
  • फोनचे वजन 206 ग्रॅम

OnePlus 7 Pro  किंमत

OnePlus 7 Pro स्मार्टफोनच्या किमतीबाबत बोलायचे तर, सुरुवातीची किंमत 48,999 रुपये इतकी असल्याचे प्रसारमाध्यमं सांगतात. या किमतीत आपल्याला 6 जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेजवाला व्हेरियंट मिळेल. या फोनच्या 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज मॉडेल किंमत 52,999 रुपये आणि 12 जीबी रॅम सोबत 256 जीबी स्टोरेज व्हेरियंट (नेब्युला ब्लू) ची किंमत 57,999 रुपये आहे.

OnePlus 7 Pro कुठे मिळेल?

हा फोन ऑफलाईन म्हणजेच दुकानात मिळेलच. परंतू, येत्या 17 मे पासून हा मोबाईल अॅमेझॉन या ऑनलाईन सेवा देणाऱ्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेन. अॅमेझॉन प्राईम ग्राहकांना मात्र हा फोन 16 मे पासूनच ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. लॉन्चिंग ऑपर्सचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता अशी की, या ग्राहकांना जिओकडून 3,300 रुपयांचा फायदा आणि 70 टक्के बायबॅक गॅरेंटी मिळेल. तुम्ही जर एसबीआय कार्ड वापरुन हा फोन खेरीद करत असाल तर, तुम्हाला 2,000 पर्यंत कॅशबॅक मिळू शकते.