14 लाख किंमतीच्या या आयपॉडमध्ये काय आहे विशेष?
apple 1st generation mp3 players (Photo Credits: Pixabay)

जुनं ते सोनं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. मग त्या घरगुती वस्तू असो किंवा तांत्रिक वस्तू. त्या जपून ठेवण्यासाठी किंवा जुनी वस्तू विकत घेण्यासाठी आपण जीवाचा आटापिटा करतो. असच काहीस अॅप्पल कंपनीचा फर्स्ट जनरेशनचा आयपॉड घेण्यासाठी होऊ शकतो. मात्र थांबा, ह्या आयपॉडची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ह्याची किंमत आहे 14 लाख रुपये..... हा आयपॉड ई-कॉमर्स साइट eBay वर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

ह्या आयपॉडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आयपॉड त्याच्या ओरिजिनल बॉक्समध्ये असून त्याची पॅकिंगसुद्धा तशीच आहे. ऑक्टोबर 2001 मध्ये स्टीव्ह जॉब्सने, तुमच्या पॉकेटमध्ये 1000 गाणी असतील, असं म्हणतं हा आयपॉड लाँच केला होता. या 14 लाखांच्या आयपॉडमध्ये ५ जीबी हार्डड्राइव्ह, दोन इंचाची एलसीडी स्क्रीन आणि एक स्क्रॉल व्हील आहे. त्याशिवाय आयपॉडला १० तासांचा बॅटरी बॅकअप आहे.

14 लाख रुपयांना हा आयपॉड विकण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे, हा आयपॉड १८ वर्ष जुना आहे. दुसरे कारण म्हणजे, आयपॉड हे अॅपलच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे डिव्हाइस आहे. त्यामुळे अॅपलचा चाहता आपल्या वैयक्तिक संग्रहात आयपॉडचा समावेश असावा अशी इच्छा बाळगणारा असेल तो हा आयपॉड नक्कीच खरेदी करेल. ह्या आयपॉडला ३९९ डॉलर म्हणजे जवळपास २८ हजार रुपयांच्या किंमतीवर लाँच करण्यात आले होते.

खोट्या फोनच्या बदल्यात नवे फोन उकाळून, Apple कंपनीला लाखो रुपयांचा गंडा; दोन चीनी विद्यार्थ्यांचा प्रताप

आयपॉड हा त्यावेळी अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला होता. मात्र कालांतराने आयपॉडची जागा स्मार्टफोनने घेतली. आणि आयपॉडचे मागणी कमी झाली. म्हणूनच या सीरिजच्या डिव्हाइजचे उत्पादन २०१७ रोजी बंद करण्यात आले.