मोठ मोठ्या कंपन्यांना लुबाडले गेल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो, ऑनलाईन फ्रॉड हा तर कॉमन प्रकार झाला आहे. मात्र आता दोन विद्यार्थ्यांनी चक्क मोबाइल कंपनी अॅपल (Apple) ला गंडा लावल्याचा प्रकार घडला आहे. 8,95,800 डॉलर्स म्हणजेच जवळपास 62 कोटी रुपयांना या कंपनीला लुबाडले आहे. खोट्या मोबाईल बदल्यात अॅपलचा खरा फोन प्राप्त करून, नंतर तो बाहेर विकून या तरुणांनी इतके पैसे कमावले आहेत. यांग्याग जोहू आणि क्वान जियांग अशी या तरुणांची नावे आहेत. जोहूने ऑरेगन यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. तर क्वान बेंटन कॉलेजमध्ये शेवटच्या सेमिस्टरला आहे.
तर हे दोन्ही तरुण चीन इथून अॅपलचे खोटे फोन मागवून घेत असत. त्यानंतर हे फोन अॅपलच्या सर्व्हिस सेंटरला घेऊन जाऊन ते सुरु होत नसल्याचे सांगत. त्या बदल्यात कंपनी त्यांना नवीन फोन देत असे. नंतर हे खरे फोन ते चीनच्या बाजारात विकत असत. हे खोटे फोन अगदी खऱ्या फोनसारखे असल्याने कोणालाही संशय आला नाही. या दोघांचे हे काम 2017 पासून चालू होते.
दोन्ही तरूणांनी अॅपलच्या वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटरमध्ये 3,069 आयफोन रिप्लेस करण्यासाठी दिले, ज्यातील 1, 493 फोन अॅपलने बदलून दिले, ज्यामुळे कंपनीला इतके मोठे नुकसान झाले आहे. नंतर हे फोन परत चीनला पाठवून तिथे हे फोन विकले जात असत. (हेही वाचा: नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+)
दरम्यान मेरिकन कस्टम एजन्सीने हॉंगकॉंगहून आलेले काही पार्सल पकडले होते, ज्यावर ब्रॅंडिंग अॅपलचे होते मात्र आता खोटे फोन आढळले. त्यानंतर चौकशी दरम्यान लक्षात आले की, दर महिन्याला अशाप्रकारचे 20-30 फोन येत असतात, जे नंतर रिप्लेस करून परत पाठवले जातात. याबाबतीत अॅपलने नोटीसही पाठवली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता अॅपलने या दोघांविरीद्ध केस दाखल केली आहे. मात्र आपल्या बचावार्थ हे फोन खोटे असल्याचे आम्हालाही माहित नव्हते असे या दोघांनी सांगितले आहे.