Apple TV+ (Photo Credits-Twitter)

Apple कंपनीने सोमवारी आपल्या स्टार-पॅक्ट ओरिजनल व्हिडिओ सर्विसचा खुलासा केला आहे. त्याचसोबत कंपनीने मॅगझिन आणि वृत्तपत्रासाठी सब्ससिक्रिप्शन प्लॅनसुद्धा सुरु केला आहे. मात्र कंपनी आता डिजिटल पद्धतीने काम करण्यावर जास्त भर देत आहे. तसेच अॅपल कंपनीने मोबाईल आणि अन्य डिवाईससाठी एअर गेम सब्सक्रिप्शन अॅपल Arcade सुद्धा झळकवण्यात आला आहे.

या कार्यक्रमादरम्यान डायरेक्चर स्टीवन स्पीलबर्ग यांच्यासह टीव्ही होस्ट Orpah Winfrey आणि हॉलिवूड स्टार जेनिफर एनिस्टसह अन्य कलाकार उपस्थितीत होते. अॅपल कंपनीच्या Apple Tv+ सुविधा नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनला टक्कर देणारी ठरणार आहे. अॅपल टीव्ही प्लस एक ऑन डिमांड, अॅड फ्री सर्विस असून या वर्षी 100 देशात लॉन्च केला जाणार आहे. त्यामध्ये भारताचेसुद्धा नाव आहे.

Apple TV Tweet:

तसेच कंपनीने कार्यक्रमादरम्यान एका नवीन अॅपल न्यूज प्लस सर्विससुद्धा लॉन्च केली आहे. त्यासाठी ग्राहकांना महिन्यासाठी 9.99 डॉलर मोजावे लागणार आहेत. यामध्ये वॉल स्ट्रिट जर्नल, डिजिटल न्यूज वेबसाईट आणि रोलिंग स्टोन, टाइम, वायर्ड व द न्यूयॉर्कर सारखे 300 पेक्षा अधिक मॅगझिन उपलब्ध करुन देणार आहेत.