Xiaomi चा दिवाळी धमाका, 1 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार
शाओमी दिवाळी धमाका सेल (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीने यंदाच्या दिवाळीसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. तर शाओमीच्या सेलला Diwali With Mi असे नाव देण्यात आले आहे. येत्या 28 सप्टेंबर पासून हा सेल सुरु होणार असून 4 ऑक्टोंबर पर्यंत सुरु राहणार आहे. शाओमीच्या या सेलमध्ये ग्राहकांसाठी 1 रुपयांचा फ्लॅश सेल सुद्धा सुरु होणार आहे. त्यानुसार शाओमी कंपनीचे Redmi K20, Mi Smart Band 4 सह अन्य प्रोक्डक्ट्स सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार असून फक्त 1 रुपयात खरेदी करता येणार आहेत. 1 रुपयांचा फ्लॅश सेल प्रत्येक दिवशी संध्याकाळी 4 वाजता Mi.com वर सुरु होणार आहे.

सेलदरम्यान शाओमीच्या स्मार्टफोन खरेदीसाठी HDFC बँक कार्ड्स आणि EMI साठी 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच शाओमीचा हा सेल त्यांच्या वेबसाईटसह फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सुद्धा सुरु राहणार आहे. तर जाणून घ्या शाओमीच्या कोणत्या स्मार्टफोनवर सेलमध्ये सूट देण्यात येणार आहे.

>>Redmi 7A फक्त 4,999 रुपये

शाओमीच्या सेलमध्ये रेडमी 7A हा स्मार्टफोन ग्राहकांना 4,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये HDFC बँक खातेधारकांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे.

>>Redmi Y3

सेलमध्ये रेडमी Y3 च्या स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. वाय 3 स्मार्टफोनसाठी 3GB आणि 4GB असे ऑप्शन देण्यात आले असून Mi.com वर त्याबाबत अधिक माहिती दिली आहे.(सणाच्या काळात कोणत्याही ऑनलाईन सेलमधून वस्तू घेण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी, नाहीतर फसवणूक होईल)

त्याचसोबत सेमध्ये एमआय कंपनीच्या टीव्हींच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत. या लिस्टमध्ये 32 इंच असणारा Mi LED TV 4A Pro, 32 इंचाचा Mi LED TV 4C Pro, 43 इंचाचा Mi LED TV 4A Proआणि 55 इंचाचा Mi LED TV 4X Pro सामील आहे. 10,000 mAh ची Mi Power Bank 2i आणि Mi Band 3 सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सेमध्ये सुरुवाती किंमत 399 रुपये असणाऱ्या वस्तूंवर Mi Protect मिळणार आहे.