व्होडाफोन-आयडिया कंपनीला टाळे लागणार? पाहा कुमार मंगलम बिर्ला काय म्हणाले?

केंद्र सरकारकडून व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) कंपनीला दिलासा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कंपनीला नाईलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागणार आहे, अशी माहिती मंगलम बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख मंगलम बिर्ला यांनी दिली आहे. दुसऱ्या तिमाहीत कपंनीचा 4.5 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. यातच कंपनीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 53 हजार कोटींचे शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये व्होडाफोन आडियाचे कोट्याहून अधिक ग्राहक आहेत.

रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यानंतर अनेक कंपनीला टाळे लागले आहेच. तसेच बाजारात टिकण्यासाठी आयडिया कंपनीचे व्होडाफोनमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर सरकारच्या नव्या धोरणांमुळे व्होडाफोन आयडिया कंपनीचे मोठे नुकसानीच्या सामोरे जावा लागत असल्याचा दावा मंगलम बिर्ला यांनी केला आहे. एवढेच नव्हेतर, जेष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनीदेखील जाहीर कार्यक्रमात सरकारच्या नव्या धोरणांवर नाराजीही व्यक्त केली होती. सध्या व्होडाफोन आयडिया तोट्यात असून कंपनीला तब्बल 1.17 लाख कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. सरकारने त्यांच्या धोरणात बदल केला नाहीतर, भारतात व्यवसाय करणे अवघड होणार आहे. एवढेच नव्हे तर,  व्होडाफोन आयडिया कपंनीला सेवा बंद करावी लागणार आहे. हे देखील वाचा- पुण्यातील बारावी पास महिलेने सँमसंग वेबसाइटमध्ये शोधल्या 2 त्रुटी; कंपनीने दिले 1 हजार डॉलरचे बक्षीस

बाजारात व्यवसाय करत असलेल्या सर्व दुरसंचार कंपनीने त्यांच्या टॅरिफ रेट मध्ये वाढ केली आहे. सध्या रिलायन्स जिओच्या व्यतिरिक्त कोणत्याच कंपनीला फायदा होत नसल्याचे दिसत आहे. भारतात सर्वाधिक पसंती मिळवणारे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.