WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप एवढ्यात अगदीचं अक्टीव्ह मोडवर आहे. २०२२ मध्ये व्हॉट्सअप नवनवीन भन्नाट फिचर घेवून आला. पण आता २०२३ मध्ये देखील व्हॉट्सअने नव्या फिचरचा सपाटाचं लावला आहे असं म्हणायला हरकत नाही.  कारण गेल्या आठवड्यातचं व्हॉट्सअप एक नवा आणि भन्नाट फिचर घेवून आला. ज्यानुसार आता विना इंटरनेट व्हॉट्सअप वापरता येणार आहे. म्हणजे व्हॉट्सअप चॅट करायला आता इंटरनेटची गरज नसणार आहे. या अफलातून अपडेट नंतर व्हॉट्सअप आता व्हॉट्सअप स्टेटस संबंधीत एक अनोखा फिचर घेवून येत आहे. ज्यानुसार आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेट्स संबंधित काही विशेष बदल बघायला मिळणार आहे. व्हॉट्सअप रिपोर्ट स्टेटस अपडेट या नव्या फिचरनुसार व्हॉट्स स्टेटस संबंधीत सुरक्षा मिळणार आहे.

 

WABetaInfo च्या या नव्या अपडेटनुसार प्रत्येक व्हॉट्सअप वापरकर्ता त्याच्या स्टेटस अपडेटबाबत रिपोर्ट करु शकतो. म्हणजेचं व्हॉट्सअपच्या स्टेटसद्वारे काही चुकीचा संदेश पसरत असल्यास तुम्हाला त्याची माहिती थेट व्हॉट्सअपला देता येणार आहे.  तरी या नव्या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला थेट व्हॉट्सअपकडे तक्रार नोंदवता येणार आहे. व्हॉट्सअप वापरकर्त्यांच्या दृष्टीने हा एक सुरक्षित अपडेट आहे. (हे ही वाचा:- BIS quality standards: यूएसबी, टाइप-सी चार्जर्स, डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून गुणवत्ता मानके जारी)

 

म्हणजेचं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर कुठलाही व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यास तुम्ही स्टेटसवर ठेवू असणारा इच्छित कंटेंट सर्वप्रथम व्हॉट्सअप मॉडरेशन टीमला पाठवण्यात येईल. त्यानंतर ही टीम तपासून बघेल की स्टेटसद्वारे प्रकाशित होणार असलेला हा कंटेंट व्हॉट्सअपच्या नियम व अटीत बसतो का? म्हणजेच आता व्हॉट्सअप स्टेटस हा इन्ड टू इन्ड एनक्रीपटेड नसेल. तरी व्हॉट्स अप मॉडरेशन टीमला प्रत्येक व्हॉटसअप वापरकर्ता व्हॉट्सअप स्टेटसला काय माहिती शेअर करतो ह्याची नोंद असेल.