प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) नवीन Bug आल्याने ते अपडेट करण्यापूर्वी विचार करा. खरंतर व्हॉट्सअॅप व्हर्जन 2.19.66 या अपडेटमध्ये युजर्सचे फोटो आणि चॅट डिलिट होत आहेत. या बगने व्हॉट्सअॅप बीटा युजर्स अकाउंट प्रभावित केले आहे. त्यामुळे अपडेट केल्यानंतर सामान्य युजर्सकडून अशा पद्धतीची तक्रार करण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमधील हे बग चॅट आणि फोटो डिलिट करत असल्याचे समोर आले आहे.

तसेच फोटो मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असल्याने सुरक्षित राहतात. मात्र चॅट एकदा डिलिट झाल्यास ते पुन्हा मिळू शकत नाही. याबद्दल एका युजर्सने माहिती देत असे सांगितले की, व्हॉट्सअॅपचे हे नवे व्हर्जन अपडेट करु नये. कारण यामध्ये कोणतेही नवीन फिचर्स देण्यात आलेले नाही. तर काही युजर्स असे सांगत आहेत की, व्हॉट्सअॅपने या बगला फिक्स केले आहे. तसेच व्हॉट्सअॅप मधील स्टेटस पाहाण्यास गेल्यास ते ग्रे रंगाचे दिसून येत आहे. त्यानंतरही युजर्सला काही गोष्टींबाबत अडथळे येत आाहेत. (हेही वाचा-'व्हॉट्सॲप'मधील Android च्या डूडल मध्येही लवकरच दिसणार सर्च बार)

व्हॉट्सअॅपने नुकतेच आयफोन युजर्ससाठी नवीन अपडेट आणले आहे. त्यामध्ये फेस आयडी आणि रिड चॅट फिचर्स देण्यात आले आहे. या फिचर्सच्या मदतीने व्हॉट्सअॅप फेस आयडीनेसुद्धा अनलॉक करता येणार आहे.