Black Friday Sale 2021 ( File Photo)

अमेरिकेमध्ये सध्या Black Friday 2021 Sale सुरू आहे. यामध्ये अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या रिटेलर्स कडून नागरिकांना धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट्स दिली जातात. या ऑफर्स केवळ ई कॉमस्र कडूनच नव्हे तर अनेक टेलिकॉम कंपन्या, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सूट दिली जाते. हा शॉपिंग फेस्टिवल प्रामुख्याने अमेरिकेतील आहे. पण भारतीयांना यंदा या ब्लॅक फ्रायडे ऑफर्स मध्ये काय मिळणार? हा प्रश्न देखील अनेकांना सतावत आहे.

ब्लॅक फ्रायडे सेल नेमका काय असतो?

अमेरिकेमध्ये ब्लॅक फ्रायडे हा वार्षिक शॉपिंग फेस्टिवल आहे. हा थॅक्स गिविंग नंतर शुक्रवारी सुरू होतो आणि त्यानंतरच्या सोमवार पर्यंत सुरू असतो. हा सोमवार सायबर मंडे (Cyber Monday) म्हणून देखील ओळखला जातो. या शॉपिंग इव्हेंट द्वारा अमेरिकेमध्ये आगामी सणासुदीच्या काळाची नांदी केली जाते. भारतामध्ये यच धर्तीवर दसरा, दिवाळीच्या तोंडावर Flipkart चा Big Shopping Days sale आणि Amazon चा Great Indian Festival चालतो. यंदा अमेरिकेमध्ये 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत हा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू राहणार आहे. नक्की वाचा: Flipkart कडून नागरिकांसाठी खास सुविधा ! Flight Booking वर 2500 रुपयांची मिळणार सूट .

भारतामध्ये ब्लॅक फ्रायडे डील्स कशा मिळू शकतात?

ब्लॅक फ्रायडे सेल हा भारतामध्ये नसतो. त्यामुळे अमेझॉनच्या भारतातील वेबसाईटवर त्याच्या प्रामुख्याने ऑफर्स नसतील. पण अमेझॉन जगभरात आपल्या वस्तू पोहचवत असल्याने Amazon India ऐवजी खरेदीदार अमेरिकेच्या अमेझॉनवर ऑनलाईन खरेदी करू शकतात. मात्र व्यवहार करताना तुम्ही खरेदी करत असलेली वस्तू ग्लोबल शिपिंग साठी आहे की नाही? हे तपासून पहा. एखादी वस्तू घ्यायची असल्यास थर्ड पार्टी शिपिंग सर्व्हिस च्या माध्यामातून भारतामध्ये ती वस्तू कुरियर करू शकतात. यावेळी देखील खरेदी करताना शिपिंग फी, कस्टम ड्युटी तपासून पाहा.

Apple iPhone 12 Mini या ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये Good Guys website वर $948 मध्ये उपलब्ध आहे. Google Pixel 5a 5G हा $399  ला US Google Store द्वारा उपलब्ध आहे. तर Amazon Kindle हा Amazon.com वर $49.99 मध्ये उपलब्ध आहे.