व्होडाफोन- आयडिया (Vodafone-Idea) आणि एअरटेल (Airtel) कंपनीने याआधीच टॅरिफ शुल्क (Tariff Rate) वाढण्याचे जाहर केले होते. यातच रिलायन्स जिओने (Reliance Jio) देखील त्यांच्या टॅरिफ शुल्कच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच जिओ कंपनी मोबाईल सेवेच्या दरांमध्ये संशोधन करण्यासाठी ट्राय कंपन्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बाजारात जिओच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे.
रिलायन्स जिओने बाजारात दाखल होताच खळबळ निर्माण केली होती. तसेच काही कंपनीला जिओमुळे टाळे देखील लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वत दरात अनेक सुविधा भेटत असल्याने ग्राहकांनी जिओला पसंती दिली होती. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनी काही दिवसापूर्वी त्यांच्या टॅरिफ शुल्क वाढवण्याचा जाहीर केले होते. त्यानंतर आज रिलायन्स जिओने त्यांच्या टॅरिफ शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने याआधी दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी आययूसी व्हाऊचर आणले होते, आता टॅरिफ शुल्कही वाढवण्यात आले आहे. जिओच्या या निर्णयाचा फटका असंख्य ग्राहकांना बसणार आहे. हे देखील वाचा- Airtel डिजिटल टीव्हीच्या 'या' युजर्सना मिळणार 30 दिवस फ्री सर्विस
ट्राय हे टेलिकॉम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीची वाट बघणार आहे, असे ट्रायने सांगितल्याचे समजत आहे. ट्राय शुल्क वाढ नियमानुसार आहे का नाही ते पाहण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. स्वस्त दरात अनेक सुविधा भेटत असल्याने ग्राहकांनी जिओला पसंती दिली होती. अतिरिक्त शुल्कात वाढ झाल्याने ग्राहकांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे.