 
                                                                 डीटीएच (DTH) इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन वेगाने वाढत आहे. ऑपरेटर्स त्यांना युजर्संवर भुरळ घालण्यासाठी नव्या नव्या प्लॅनची घोषणा करत आहेत. या मध्येच एअरटेलने त्यांच्या युजर्ससाठी एक नवी ऑफर आणली आहे. त्यानुसार कंपनी युजर्सला 30 दिवसांपर्यंत फुकटात फ्री सर्विस देणार आहे. त्याचसोबत कंपनीने असे ही सांगितले आहे की, लवकरच इंन्स्टॉलेशन चार्ज सुद्धा आकारणार नाही आहेत. तर इन्स्टॉलेशन चार्ज बंद केल्यानंतर युजर्सला फक्त रिप्रेजेंटेटिव्ह चार्ज द्यावा लागणार आहे.
एअरटेल डिजिटल टीव्ही सेट टॉप बॉक्स युजर्सला आता कमी किंमती मध्ये खरेदी करता येणार आहे. एअरटेलचा SD बॉक्स 1100 रुपये आणि HD बॉक्स 1300 रुपयांना खरेदी करता येणार आहे. मात्र नव्या युजर्सलाच नाही तर यापूर्वीच्या युजर्सला सुद्धा एक महिन्यासाठी फ्री सर्विस देण्यात येणार आहे. परंतु सध्याच्या युजर्सला 11 महिन्यांचा रिजार्च करावा लागणार आहे.(नवीन नियमांमुळे केबल-डीटीएच शुल्कात 15 टक्क्यांनी कपात)
तसेच युजर्सला सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन करण्यासाठी येणाऱ्या इंजिनिअरला 250 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचसोबत यापूर्वी सुद्धा डीटीएच ऑपरेटर D2h यांनी त्यांच्या डिअॅक्टिव्ह युजर्ससाठी Loyalty Ki Royalty ऑफर आणली होती. त्याअंतर्गत 6 महिने आणि 12 महिन्याच्या पॅकमध्ये युजर्सला 30 दिवस अतिरिक्त सर्विस देण्यात आल्या होत्या.
TRAI लवकरच त्यांच्या ग्राहकांना DTH सेवेत बदल करुन ती सोप्या पद्धतीची बनवणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सेट टॉप बॉक्स न खरेदी करता DTH सेवेत बदल करु शकणार आहे. तर वर्षाच्या शेवटी ही योजना लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहक एका डीटीएचला दुसऱ्या डीटीएचमध्ये सेट टॉप बॉक्सशिवाय बदलू शकणार आहे. मात्र ग्राहकांना आपल्या सेट टॉप बॉक्समध्ये नवीन सॉफ्टवेअर टाकावे लागणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
