Vodafone ची हॅपी न्यू ईअर ऑफर; मिळेल डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा
Vodafone (Photo Credit Which.co.uk)

टेलिकॉम कंपन्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वारंवार नवनव्या ऑफर्स सादर करत असतात. अशीच एक नवी ऑफर Vodafone ने आपल्या युजर्ससाठी आणली आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Vodafone ने देखील हॅप्पी न्यू ईअर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सला Amazon Pay वर 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ युजर्सला 10 जानेवारी 2019 पर्यंत मिळेल. याशिवाय युजर्सला अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा देखील लाभ मिळेल. त्याचबरोबर दररोज 100 एसएमएस फ्री मिळतील. Vodafone च्या या नव्या प्रीपेड प्लॅनची किंमत आहे 398 रुपये. या प्लॅनमध्ये युजर्सला 69 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. त्याचबरोबर युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत 1GB डेटा देखील मिळेल.

Vodafone चा हा प्लॅन सध्या मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यात लॉन्च करण्यात आला आहे. तर दिल्ली आणि नार्थ ईस्टच्या युजर्सला ही ऑफर 369 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देण्यात येईल. याशिवाय Vodafone चा अजून एक 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यात तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळू शकते. यात तुम्हाला रोज 1GB डेटा आणि अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंगचाही लाभ मिळेल.

Airtel च्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला आता 1.5GB डेटा मिळत आहे. पूर्वीच्या प्लॅनमध्ये 1.4 GB डेटा मिळत होता. त्यामध्ये आता 100 MB फ्री डेटा अधिक देण्यात येईल. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 100 एसएमएस चा देखील लाभ मिळेल. सुरुवातीला या प्लॅनमध्ये युजर्सला महिन्याभरासाठी 39.2GB डेटा मिळत होता. पण हा प्लॅन रिव्हाईज केल्यानंतर आता युजर्सला महिन्याभरासाठी 42GB डेटा मिळत आहे.