Vivo Y75 5G (Photo Credits-Twitter)

विवो कंपनीचा नवा स्मार्टफोन Vivo Y75 5G भारतात लॉन्च झाला आहे. फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये येणार आहे. तसेच फोनमध्ये 4 जीबी वर्च्युअल रॅम सपोर्ट दिला गेला आहे. फोनची किंमत 21,990 रुपये आहे. ब्लॅक आणि ग्रोइंग गॅलेक्सी रंगात हा स्मार्टफोन युजर्सला खरेदी करता येणार आहे. फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेट सपोर्टसह दिला गेला आहे. त्याचसोबत फोटोग्राफासाठी 50MP रियर कॅमेरा दिला आहे. विवो वाय75 5जी स्मार्टफोन हा वीवो इंडिया ई-स्टोरसह सर्व रिटेल पार्टनर स्टोरच्या माध्यमातून 27 जानेवारी पासून खरेदी करता येणार आहे.

Vivo Y75 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस इन-सेल डिस्प्ले दिला गेला आहे. फोन 7mm बेस्ड 5जी चिपसेटला सपोर्ट करणार आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर 1 Dimensity 700 चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. जो 2.2 GHz हाय क्लॉक रेट दिला असून अॅन्ड्रॉइड 12 आधारित Funtouch OS 12 वर काम  करणार आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. विवो वाय75 5जी स्मार्टफोनला 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उतरवण्यात आला आहे.(Tecno Pova Neo स्मार्टफोन लॉन्च, युजरला मिळणार 6000mAh च्या बॅटरीसह 'हे' धमाकेदार फिचर्स) 

Tweet:

Vivo Y21A  स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेअटप मिळणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असणार आहे. या व्यतिरिक्त 2MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा दिला गेला आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा आय फोकस कॅमेरा दिला गेला आहे.  फोन पोर्टेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाइट मोडसह येणार आहे. फोनच्या फ्रंटला 16MP चा एक्सट्रीम सुपर नाइट सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. तर विवो वाय75 स्मार्टफोन 8mm थिक आणि 2.5D फ्लॅग फ्रेमसह येणार आहे. फोनचे वजन 182 ग्रॅम आहे. फोन मल्टी टर्बो 5.0 इन्हॅन्स डेटा कनेक्शनसह येणार आहे.