विवो (Vivo)च्या 4 कॅमेर्यांच्या स्मार्टफोन वीवो V19 ची अनेक दिवसांपासून ग्राहक प्रतिक्षा करत होते. अखेर आज (12 मे) दिवशी हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्यास सज्ज आहे. या फोनचं ग्लोबल लॉन्चिंग झालं आहे. मात्र भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे त्याचं लॉन्चिंग लांबणीवर पडलं होतं. मात्र आता विवोचा हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. Vivo V19 स्मार्टफोन हा कोणत्याही लॉंचिंग इव्हेंट शिवाय नव्हे तर एका ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग द्वारा लॉन्च केला जाईल.
Vivo V19 चे फीचर्स
Vivo V19 मध्ये ग्लोबल व्हेरिएंट असणारे खास फीचर्स असतील. जगभरात लॉन्च केलेल्या या मोबाईलमध्ये 6.44 इंच फुल एचडी+ ड्यूअल आईव्यू E3 सुपर AMOLED डिस्प्ले असेल. व्हिवोचा हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नैपड्रैगन 712 प्रोसेसरवर काम करेल. तर हा फोन अॅन्ड्रॉईड 10 बेस्ड फनटच ओएस 10 वर चालेल. वीवो वी19 मध्ये एक इन डिस्प्लेफिंगरप्रिंट स्कॅनर असेल. फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. दरम्यान हा फोन पियानो ब्लॅक, मिस्टिक सिल्वर या रंगांमध्ये उपलब्ध असेल.
No more waiting! Perfection is closer than ever! #vivoV19 reveals tomorrow. Stay tuned for #PerfectShotPerfectMoment pic.twitter.com/IXHuOwcQw9
— Vivo India (@Vivo_India) May 11, 2020
वीवो V19 मध्ये कॅमेरा हा रियर क्वाड-कॅमेरा सेटअप मध्ये असेल. फोनमध्ये स्क्रीन वर ड्यूल पंच-होल कटआउट असेल. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी, 8 मेगापिक्सल सुपर-वाइड अॅंगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर लेंस असेल. यासोबत फ्रंटला 32 मेगापिक्सल लेंस आणि 8 मेगापिक्सल वाइड-अॅंगल लेंस दिला जाऊ शकतो. फोनमध्येमें 4500mAhची बॅटरी असेल. जी 33W फ्लैश चार्ज 2.0 टेक्नॉलजी सपोर्ट करेल.