UPI Tap And Pay: UPI टॅप अँड पे सेवा जानेवारीत सुरू होणार, QR कोडला रामराम
(Photo Credits: AIR/ Twitter)

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय पेमेंट (UPI Payment) करणं आणखी सोपं होणार आहेत. लवकरच यूपीआयचे एक फिचर लाँच होणार आहे, जे एका झटक्यात पेमेंट करेल. या फिचरला टॅप अँड पे (Tap And Pay) असे नाव देण्यात आले आहे. आता अॅप उघडण्याची किंवा पासवर्ड टाकण्याची गरज नाही, फक्त आपला फोन स्कॅनरसमोर घेऊन पेमेंट करावे लागेल. आपण आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे मशीनवर टॅप करून ज्या प्रकारे पैसे देता त्याच प्रकारे हे कार्य करेल. (हेही वाचा - UPI for Secondary Market: शेअर बाजारात युपीआय आणणार क्रांती! सेकंडरी मार्केटसाठी बीटा चाचणी 1 जानेवारीपासून होणार सुरू)

यूपीआय लाइट किंवा टॅप अँड पे फीचरच्या माध्यमातून तुम्ही मोठे पेमेंट करू शकणार नाही. जर तुम्हाला 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरायचे असतील तर तुम्हाला तुमचा यूपीआय पिन टाकावा लागेल. टॅप अँड पे फीचरद्वारे तुम्ही फक्त 500 रुपयांपर्यंतच पेमेंट करू शकता. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय टॅप अँड पे सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत हे फीचर लाँच केले जाऊ शकते.

दरम्यान जर तुम्ही यूपीआय ॲप्स वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे , पेटीएम , फोनपे आणि भारतपे सारख्या सर्व यूपीआय पेमेंट ॲप्सना इनॲक्टिव्ह युपीआय खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या वर्षभरापासून यूपीआय आयडीचा वापर केला नाही त्यांची यूपीआय खाती बंद करण्यात येणार आहेत.