Twitter Layoffs: लोकप्रिय सोशल मीडिया हँडल ट्विटर (Twitter) ने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ले-ऑफ (Layoffs) ची प्रक्रिया गेल्या वर्षीपासून सुरू झाली होती. कंपनीचे नवीन मालक एलोन मस्क यांनी ट्विटरवर कर्मचारी कपातीची घोषणा केली. गेल्या शनिवारी, कंपनीने छाटणी प्रक्रियेचा भाग म्हणून डझनभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीतील कर्मचारी कपातीची ही आठवी फेरी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासूनच कंपनीत कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली होती.
ट्विटरवरील नवीन कर्मचारी कपातीचा अनेक अभियांत्रिकी टीमवर परिणाम होत आहे. यामध्ये सहाय्यक जाहिरात तंत्रज्ञान, Twitter अॅप आणि Twitter ची प्रणाली चालवणाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या नव्या छाटणीबाबत कंपनीकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. (हेही वाचा - Meta Layoff: ‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, 11 हजार लोकांना कामावरुन कमी करणार)
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच ट्विटरने 3700 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले होते. कर्मचाऱ्यांच्या छाटणीचे कारण कंपनीने कॉस्ट कटिंग असे दिले होते. मात्र, यादरम्यान कंपनीचे नवे सीईओ एलोन मस्क यांनी कंपनीची धुरा सांभाळली.
अलीकडेच कंपनीने भारतातील दोन कार्यालये बंद केली आहेत. कंपनीने सांगितले की, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, भारतापूर्वी अमेरिका, कॅनडा, यूके, न्यूझीलंड, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ट्विटर ब्लूची सशुल्क सेवा सुरू झाली होती.
मात्र, ट्विटरची सशुल्क सेवा आता भारतीय वापरकर्त्यांसाठीही सुरू झाली आहे. ट्विटरची सशुल्क सेवा भारतात वेगवेगळ्या दरात उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये हे ट्विटर वापरणाऱ्या अशा ट्विटर यूजर्ससाठी सशुल्क सबस्क्रिप्शनचे मासिक शुल्क 900 रुपये ठेवण्यात आले आहे. तथापि, वेब वापरकर्त्यांसाठी, हीच सुविधा 650 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.