Twitter (Photo Credits-File Image)

ट्विटर, ट्विटर अपडेट, ट्विटर निर्णय हे शब्द हल्ली रोज कानावर पडतात. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क रोज काय नवा निर्णय घेतील ह्याचा काही नेम नाही. यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉंगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण ट्वीटरचे नवे मालक एलॉन मस्क यासंबंधित नुकतीचं एक मोठी घोषणा केली होती. 'ट्विटर ब्लू'साठी (Twitter Blue) म्हणजेचं व्हेरिफाईड ट्वीटर अकाउंट (Verified Twitter Account) वापरकर्त्यांना हे अकाउंट वापरण्यासाठी ट्वीटरचं विशेष सबस्क्रीपशन (Subscription) घ्यावं लागणार. तर यासाठी $8/महिना किंमत मोजावी लागणार असा निर्णय एलॉन मस्क यांनी घेतला होता. ट्विटरचा हा सबस्क्रिपशन प्लॉन (Subscription Plan) सध्या अमेरीका (America), ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझिलॅन्ड (New Zealand), ब्रिटन (Britain) यांसारख्या मोठ्या प्रमाणार इंटरनेट (Internet) वापरणाऱ्या देशांसाठी घेण्यात आला होता तरी भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देखील काही दिवसांनंतर सबस्क्रिपशन चार्ज पे करावा लागेल असं एलॉन मस्क यांनी सांगित होतं. पण ट्विटर कडून घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

 

ट्विटर ब्लू टीक (Twitter Blue Tick) वापरकर्त्यांचा अचानक ब्लू टीक (Blue Tick) गायब झाले असल्याच्या तक्रारी ट्विटर वापरकर्त्यांनी केल्या आहेत.  ब्लू टिक्ससाठी अप्लाय (Apply) केल्यावर एक एरर मेसेज (Error Message) मिळत आहे, ज्यामध्ये नमूद केलं आहे की "तुमच्या अप्लिकेशन (Application) बाबत धन्यवाद, भविष्यात Twitter ब्लू तुमच्या देशात असेल असेल. कृपया नंतर पुन्हा तपासा."  म्हणजेच आता तुमच्या देशात ट्विटर ब्लू हा ऑप्शनचं अव्हेलेबल नाही असा संदेश ट्विटर वापरकर्त्यांना (Twitter User)  मिळत आहे. (हे ही वाचा:- Amazon Layoffs: Meta, Twitter आणि Microsoft नंतर आता अॅमेझॉननेही केली कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात)

 

तरी ट्विटर ब्लू टीकच्या (Twitter Blue Tick) या प्रकारे चमत्कारीक रीत्या गाब झाल्याने टेक्नॉलोजी (Technology) जगात खळबळ माजली आहे. यानंतर ट्विटर सबस्क्रिपशन चार्जचा (Subscription Charge) निर्णय मागे घेणार का या चर्चांना उधान आलं आहे. तरी तुम्ही ट्विटर ब्लू टीक (Twitter Blue Tick) धारक असल्यास तुमची ब्लू टीक अकाउंटवर आहे की नाही हे एकदा तपासून बघा.