
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ट्रायच्या नव्या निर्णयानुसार, चॅनल निवडण्यासाठी ग्राहकांना 31 मार्चपर्यंतचा कालावधी दिला जाणार आहे.
यापूर्वी चॅनल निवडीचा कालावधी 1 फेब्रुवारीपर्यंतच होता. मात्र याबाबत ग्राहक काहीसे गोंधळलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे केबल सेवा वापरणाऱ्या 65% ग्राहकांनी आणि डिटीएचच्या केवळ 35% ग्राहकांनी चॅनलची निवड केली. हे चित्र पाहता ग्राहकांच्या हिताचा विचार करुन ज्या ग्राहकांनी अद्याप चॅनल्सची निवड केलेली नाही त्यांच्यासाी 'बेस्ट फीट प्लॅन' तयार करण्यात आला आहे. तसंच जोपर्यंत ग्राहक आपल्या आवडीच्या चॅनल्सची निवड करत नाहीत तोपर्यंत ग्राहकांचा पूर्वीपासून सुरु असलेला पॅक सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. TRAI देणार आता Set Top Box ऐवजी DTH बदलण्याची सुविधा
काय आहे बेस्ट फीट प्लॅन?
चॅनल निवडीबाबत गोंधललेल्यांसाठी बेस्ट फिट प्लॅन तयार करण्याचे आदेश ट्रायने डिटीएच ऑपरेटर आणि केबल चालकांना दिले आहेत. बेस्ट फीट प्लॅनमध्ये ग्राहकांकडून साधारणपणे अधिक पाहिल्या जाणाऱ्या चॅनल्सचा समावेश असेल. ठराविक विषयाचे चॅनल्स, प्रादेशिक भाषा चॅनल्स आणि काही चॅनल्स असा एकत्रितपणे बेस्ट फिट प्लॅन तयार होणार आहे. या प्लॅनची किंमत ट्रायने ठरवल्याप्रमाणे असेल.