Mitron app (Photo Credits: Google Play Store)

टिक-टॉकला (TikTok) टक्कर देणाऱ्या मित्रो (Mitron) या अ‍ॅपची मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आतापर्यंत लाखो जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. टिक-टॉक सारखेच कमी वेळाचे व्हिडिओ बनवता येणारे हे अ‍ॅप आहे. आता या अ‍ॅप बद्दल एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. मित्रो हा ऍप भारतातील रुरुकी आयआयटीच्या (IIT)  विद्यार्थ्याने बनवल्याचे आजवर समजत होते. मात्र हा अ‍ॅप मेड इन इंडिया (Made In India) नसुन पाकिस्तानी कंपनी TicTic ची कॉपी आहे, आणि या अ‍ॅप साठी लागणारा सोर्सकोड हा भारतीय डेव्हलेपर्सने अवघ्या 2600 रुपयात विकत घेण्यात आला असल्याचा दावा पाकिस्तानी सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे. या अ‍ॅपचे सर्व फिचर्स, इंटरफेस आणि सर्व काही टिक टिक या पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी असणाऱ्या क्यूबॉक्सअसचे (Qboxus) आहेत, यातच किंचित बदल करून मित्रो हा अ‍ॅप तयार करण्यात आल्याचा या कंपनीचा दावा आहे. TikTok ची जागा घ्यायला आला Mitron? जाणून घ्या 5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेल्या या मजेशीर व्हिडिओ मेकिंग अॅप बद्दल

क्यूबॉक्सअसचा संस्थापक इरफान शेख याने दिलेल्या न्युज 18 नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अ‍ॅपसाठी सोर्सकोड 2 हजार 600 रुपयांना विकत घेतला होता. आम्ही दिलेल्या कोडच्या आधारे संपूर्ण प्रोडक्ट निर्माण केला जाईल असं आम्हाला वाटलं होतं मात्र हा सोर्सकोड विकत घेणाऱ्या मित्रोच्या सध्याच्या टीमने संपूर्ण कोड वापरुन लोगो आणि नाव बदलून तो त्यांच्या स्टोअर्सवर अपलोड केला आहे असेही शेख यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, एका महिन्यातच, हे मित्रो अ‍ॅप 50 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि Google Play Store वरील उत्कृष्ट अ‍ॅप मध्ये याचा समावेश झाला आहे. मागील काळात सुरु झालेली संपूर्ण युट्युब VS टिकटॉक वाद आणि त्यानंतर टिकटॉक वरील बंदीची मागणी, अशातच स्वदेशी च्या प्रचारासाठी 'व्होकल द लोकल' ही पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा या सगळ्याचा सध्या मित्रो अ‍ॅपला फायदा होत आहे.