TikTok ची जागा घ्यायला आला Mitron? जाणून घ्या 5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेल्या या मजेशीर व्हिडिओ मेकिंग अॅप बद्दल
मित्रों एप (Photo Credits: Google Play Store)

कमी कालावधीत आपला स्वत: चा चाहतावर्ग निर्माण केलेल्या Tiktok ला टक्कर द्यायला एका नवा अॅप आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'Mitron' (मित्रों) असे या अॅपचे नाव असून हा अॅप सध्या बराच लोकप्रिय होत आहे. हा अॅप भारतात बनवला गेला आहे असे सांगण्यात येत आहे. हा अॅप आयआयटी रुड़की (IIT Roorkee) च्या विद्यार्थ्याने महिन्याभरापूर्वी बनवले होते. या अॅपला प्ले स्टोअरवरून 5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. टिकटॉकवर सुरु असलेला वाद हे देखील मित्रों अॅप प्रसिद्ध होण्यामागे कारण असू शकते.

या व्हिडिओ अॅप बद्दल थोडी माहिती करुन घेऊयात

नेमकं काय आहे Mitron?

प्ले स्टोरवर दिलेल्या माहितीनुसार, 'मित्रों' एक मोफत शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप आहे. हा अॅप अशा लोकांसाठी बनवला आहे ज्याला कलात्मक व्हिडिओ बनविण्यात आनंद आहे. या अॅपचा वापर करणे खूपच रंजक आहे ज्यात व्हिडिओला एडिट, डिजाईन आणि सोबत शेअरही करु शकतो. यूजर्स या अॅपच्या लायब्रवरीमधून उत्कृष्ट व्हिडिओ निवडून तो बनवू शकता. या अॅपचा इंटरफेस थोडा फार टिकटॉकशी मिळता जुळता आहे. या अॅपवरील यूजरचे प्रोफाईल पेज हे टिकटॉक पेजसारखेच आहे.

Coronavirus: सोशल मीडिया व मेसेजिंग अ‍ॅप्सवर Fake Messages पाठवल्यास 'अ‍ॅडमीन' विरुद्ध होणार कठोर कारवाई; मुंबई पोलिसांनी दिला इशारा

हा अॅप कसे काम करतो?

जर युजरला व्हिडिओ बनवायचा असेल तर अन्य अॅपप्रमाणे येथे रजिस्टर करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. मग तुम्ही होम पेजवर जाऊन असंख्य व्हिडिओ बनवू शकतो. व्हिडिओ बनविण्यासाठी लाल बटनवर क्लिक करुन हा व्हिडिओ तयार करा त्यानंतर पब्लिश करा. हे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्ही यावर लाईक, कमेंट अथवा शेअर करु शकता.

आयआयटी रुड़की च्या विद्यार्थ्याने बनवलेला हा अॅप गुगल अॅनड्रॉईडवर प्लेस्टोरवर टॉप चार्ट मध्ये आहे.