POCO M2 चा नवीन व्हेरिएंट 21 एप्रिलला होणार लाँच; किंमत 10,000 रुपयांपेक्षा असेल कमी; जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स
POCO M2 (PC - Twitter)

कंपनीने POCO M2 हा स्मार्टफोन आधीचं भारतात लाँच केला होता. पण आता कंपनी 21 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता POCO M2 चा नवीन रियलओडेड व्हेरिएंट बाजारात आणणार आहे. POCO M2 चा नवीन व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल. 21 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता फोनची विक्री सुरू होईल. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करता येईल.

POCO M2 चा नवीन व्हेरिएंट मीडियाटेक हेलिओ जी 80 प्रोसेसरसह येईल. फोन पिच ब्लॅक, स्लेट ब्लू, ब्रिक रेड अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. POCO M2 च्या 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. POCO M2 चे नवीन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीला बाजारात येण्याची शक्यता आहे. (वाचा - लॉन्चिंगच्या अगोदर Oppo A74 5G स्मार्टफोनची किंमत लीक; मिड-बजेटमध्ये मिळतील 'हे' खास फिचर्स)

POCO M2 स्पेसिफिकेशन्स -

POCO M2 स्मार्टफोनला 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. तसेच POCO M2 मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 याचा उपयोग स्क्रीन संरक्षणासाठी केला गेला आहे. फोनने मीडियाटेक हेलीओ जी 80 प्रोसेसर वापरला आहे. यात ARM Mali-G52 GPU समान ग्राफिक्स वापरले गेले आहेत, जे गेमिंगच्या बाबतीत अधिक चांगले मानले जाते. POCO M2 मध्ये प्राथमिक कॅमेरा 13 एमपीचा, तर दुसरा कॅमेरा 8 एमपी वाइड एंगल कॅमेरा, 2 एमपी खोलीचा सेन्सर देण्यात आला आहे. मायक्रो फोटोग्राफीसाठी असाचं 5 एमपीचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी समोर 8 एमपी एआयचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

दरम्यान, फोनमध्ये पॉवरबॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बॅटरी पॅकद्वारे हा फोन 2 दिवस वापरता येतो. फोनमध्ये 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.0, ड्युअल मायक्रोफोन, 3.5 एमएम हेडफोन जॅक, अल्ट्रा लाइनर स्पीकर देण्यात आला आहे.