सॅमसंग (Samsung) कंपनीचे मोबाईलला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे सॅमसंग कंपनी नवनवीन फिचर्ससह मोबाईल बाजारात आणते. आता नुकतेच कंपनीने आपला गॅलेक्सी झेड फोल्ड 3 (Galaxy Z Fold 3) आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 3 (Galaxy Z Flip 3) फोल्डेबल स्मार्टफोन (Smartphone) बाजारात आणणार असल्याचे समजले आहे. या मोबाईल लाँचीगसाठी (Mobile Launch) एक कार्यक्रम घेणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कंपनीने आपल्या कार्यक्रमात दोन्ही फोनची एक बाह्यरेखा दर्शविली आणि या कार्यक्रमास गॅलेक्सी (Samsung galexy) अनपॅकड म्हटले जात आहे. गॅलक्सी झेड फोल्ड 3 हा अंडर-स्क्रीन कॅमेरा तंत्रज्ञान दर्शविणारा सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच एस पेन स्टाईलला पाठिंबा देणारा आपला पहिला फोल्डेबल फोन असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3 मूळ गॅलेक्सी फोल्ड आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 2 या फोल्डींग मोबाईलला मोठ्या प्रमाणात मागणी असेल.
गॅलेक्सी झेड फोल्ड सिरीज बाजारात आपलं वर्चस्व निर्माण करेल. तसेच वापरकर्त्यांनाही हा मोबाईल पसंतीस येईल अशी कंपनीला अपेक्षा आहे. या मोबाईल संदर्भातील सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यामुळे या मोबाईलच्या रचनेबाबत वापरकर्त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. या लीक फोटोमुळे हा मोबाईल 3 रंगामध्येे असेल असे समजते आहे.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3 मध्ये मोठा लवचिक पद्धतीने तयार केला आहे. तसेच फोल्ड केल्यावर बाह्य प्रदर्शन देखील असेल. अंतर्गत प्रदर्शन 2208 x 1768 पिक्सलच्या रिजोल्यूशनसह 7.56 इंच मोजेल. 2268 x 832 पिक्सल रिजोल्यूशनसह बाह्य प्रदर्शनात 6.23 इंचाचा आकाराचा असेल. एलटीपीओ) बॅकप्लेन आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट असल्याचेही दावा करण्यात आला आहे. फ्रंट डिस्प्लेवर 5 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल अशी अपेक्षा आहे .
गॅलेक्सी झेड फोल्ड च्या प्रमुख फ्लॅगशिप हार्डवेअर असेल. तर चांगला रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रगन 888 किंवा यापेक्षा अधिक सॉफ्टवेअर असू शकते. कदाचित किमान 12 जीबी - आणि किमान 256 जीबी स्टोरेज असू शकते. तसेच सॅमसंग एएमडी जीपीयूसह एक्सिनोस वापरू शकेल .ज्यावर कंपनी काम करत असल्याचे म्हटले जात आहे. बॅटरीची क्षमता गॅलेक्सी झेड फोल्ड 2 पेक्षा थोडी लहान असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मूळ फोल्डप्रमाणेच 4380 एमएएच बॅटरी क्षमता आहे. फोन जाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्या जाडीमध्ये अतिरिक्त फिचर्स असणे आवश्यक आहे. स्तर, चांगले स्क्रीन व्यवस्थापन किंवा आर्मर फ्रेम असेल अशी अपेक्षा आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, मूळ फोल्ड आणि झेड फोल्ड 2 दोन्ही 5 जी आहेत. एवढ्या नवीन फिचर्समुळे हा मोबाईल मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांच्या पसंतीस पडेल. तरी अजून या फोनच्या किंमतीबाबत कंपनीने खुलासा केला नाही आहे.