WhatsApp ला टक्कर देणारे ठरतेय Telegram App, युजर्सला प्रायव्हेट व्हिडिओ कॉलिंगचे दिले जाणार फिचर
Telegram (Photo Credits-Twitter)

सर्वात प्रसिद्ध असे मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपला (WhatsApp) जर कोण टक्कर देत असेल तर ते टेलिग्राम अॅप (Telegram App) आहे. कारण हे अॅप युजर्सचे चॅट्स पूर्णपणे सुरक्षित आणि सिक्युअर ठेवत असल्याचा दावा करत आहे. तसेच व्हॉट्सअॅपचा डेटा लीक झाल्याची काही प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. टेलिग्रॅमचे सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात युजर्सची संख्या आहे. परंतु या अॅपवर युजर्सला व्हिडिओ कॉलिंगचे फिचर दिले जात नव्हते. परंतु आता युजर्सला यामध्ये व्हिडिओ कॉलिंगचे फिचर उपलब्ध करुन देणार आहे.

2013 मध्ये हे अॅप सीक्रेट मेसेजिंग फिचरवर फोकससह सुरु करण्यात आला होता. सध्या टेलिग्रामचे 40 कोटीहून अधिक युजर्स आहेत. हा अॅप सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या टॉप10 अॅप पैकी एक आहे. परंतु सध्या नवा व्हिडिओ कॉलिंग फिचर हा अल्फा स्टेडमध्ये आहे. टेलिग्रामवर युजर्सला चॅटिंग आणि मल्टीमिडीया शेअरिंग व्यतिरिक्त वॉईस कॉलिंगचा सुद्धा ऑप्शन मिळणार आहे. या अॅपवर मिळणारी सर्व सर्विसेस अॅड-टू-अॅड अॅनक्रिप्टेड आणि पूर्णपणे सिक्युर आहे. (Motorola One Fusion Plus उद्या Flipkart वर सेल , 6GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनची काय आहेत खास वैशिष्ट्ये)

व्हॉट्सअॅपवर जेथे व्हिडिओ कॉलिंगचे फिचर हे युजर्सला 2016 मध्ये मिळाले होते. तर टेलिग्रामचे हे ऑप्शन त्यावेळी उपलब्ध नव्हते. टेलिग्रामचे लेटेस्ट वर्जन व्हिडिओ कॉलिंग फिचरच्या टेस्टिंग व्यतिरिक्त अॅनिमिटेड इमोजी ऑप्शन सुद्धा घेऊन आला आहे. अॅपमध्ये व्हिडिओ कॉलिंग कोणत्याही कॉन्टॅक्टच्या प्रोफाईल पेजवरुन करता येणार आहे. सध्या ग्रुप कॉलिंगचा ऑप्शन युजर्सला दिलेला नाही. वन-टू-वन व्हिडिओ कॉल्स ही फक्त करता येणार आहे. (Facebook: धोकादायक, हानिकारक मजकूर, सामग्रीचा फेसबुकला कसा लागतो पत्ता?)

अॅपच्या माध्यमातून करण्यात येणारे सर्व व्हिडिओ कॉल्स अॅनक्रिप्टेड असून ते एका इमोजीच्या माध्यमातून कन्फर्म केला आहे. त्याचसोबत चार इमोजी वॉईस कॉलवेळी एनक्रिप्शन दाखवले जाते. एक ब्लॉग पोस्ट मध्ये टेलिग्रामने असे म्हटले आहे की, 2020 मध्ये फेस-टू-फेस कम्युनिकेशनची गरज पहायला मिळाली. आमच्या व्हिडिओ कॉलिंगचे फिचरचे अल्फा वर्जन अॅन्ड्रॉइन आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे ते लवकरच अपडेट केले जाऊ शकते.