बॅटरी आणि कॅमे-याच्या बाबतीत जबरदस्त अनुभव देणारा Tecno Spark 7P स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अजून काही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये इतकी खास आहेत की की अन्य ब्रँडच्या स्मार्टफोन्सला जबरदस्त टक्कर देतील. हा स्मार्टफोन 4 रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमे-याच्या बाबतीत हा फोन अव्वल आहे.
Tecno Spark 7P च्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.8 इंचाची HD+डिस्प्ले देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. Tecno Spark 7P मध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली आहे, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तसेच यात 128GB चा सुद्धा पर्याय देण्यात आला आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डद्वारे तुम्ही वाढवू शकता.
हेदेखील वाचा- WhatsApp Pink Installation Link चे मेसेजेस Malware!सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? घ्या जाणून
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 16MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय या फोनच्या मागील बाजूस दोन अन्य कॅमेरे दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा कॅमेरा मिळतो. त्याशिवया फोनच्या मागील बाजूस ड्युअल LED फ्लॅश सपोर्ट मिळतो.
Tecno Spark 7P स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात सुरक्षेसाठी रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS वर काम करतो.
काही दिवसांपूर्वी भारतात Tecno Spark 7 लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन पोको, रियलमी, शाओमी सारख्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देणार आहे.
या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये इतकी आहे. यात दोन पर्याय देण्यात आले आहेत. एक 2GB+32GB स्टोरेज आणि 3GB+64GB स्टोरेज देण्यात आले आहे. याच्या हाय एंड वेरियंटची किंमत 8,499 रुपये इतकी आहे.