WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये अनेक व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp( युजर्सना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपचा रंग हिरव्यावरून गुलाबी (WhatsApp Pink Installation Link) करण्यासाठी काही लिंक मिळत असल्याचं सांगण्यात आले आहे. यामध्ये असादेखील दावा करण्यात आला आहे की हे व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर आहे. सध्या झपाट्याने हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप वर वायरल होत आहे पण तुम्हांलाही मेसेज आला असेल तर सावध रहा कारण हा मालवेअर (Malware) आहे. तुम्ही या मेसेजवर मूळीच क्लिक करू नका कारण हा वायरस आहे. Online Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर!

प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी बाब  म्हणजे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॅप लोगो किंवा थीमचा रंग बदलणं शक्य नाही. जर तसे काही बदल होणार असतील तर कंपनीकडून अधिकृतरित्या त्याची माहिती दिली जाईल. सध्या वायरल होत असलेली लिंक ही अकाऊंटमधील माहिती चोरण्याच्या उद्देशाने पसरवली जात आहे. सायबर सिक्युरिटीने देखील अशाप्रकारच्या लिंक्सवर क्लिक करणं धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. यामुळे फोन हॅक होऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप पिंक इंस्टॉलेशन  लिंक पासून सुरक्षित कसे रहाल?

  1. युआरएल मध्ये काही ग्रॅमॅटिकल चूका, स्पेलिंग एरर आहेत का बघा. कीवर्ड्स पाहून लिंक पाहता येईल.
  2. गिफ्ट्चं आमिष किंवा अनऑफिशिएल बदल यांचं आमिष दाखवणारी लिंक्स टाळा.
  3. संशय आहे अशा लिंक्स इतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर शेअर करणं टाळा.
  4. जर लोगो किंवा थीम मध्ये बदल होणार असतील तर त्याची माहिती अधिकृत पेजेसवर दिली आहे का? हे पडताळून बघा.