Online Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर!
Online Payment (Photo Credits: PTI)

आजकाल ऑन्लाईन फ्रॉड होण्याचे प्रमाण वाढलं आहे. आता त्यालाच रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी खास हेल्पलाईन नंबर जारी करत नागरिकांना तात्काळ यावे संपर्क साधत ऑनलाईन फायनांशिअल फ्रॉड्स मध्ये गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले आहे. 155260 ही हेल्पलाईन यापूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सायबर क्राईम्ससाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांची सायबर सेल आणि केंद्रीय गृहमंत्रालय मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून एकत्र काम करत आहे. हा प्रोजेक्ट त्यांनी पायलट बेसिस वर सुरू केला होता. हेल्पलाईन नंबर वर 10 लाईंस वाढवण्यात आल्या होत्या तर रिपोर्ट्सनुसार, 23 पीडितांना त्यांचे पैसे या हेल्पलाईनच्या माध्यमातून परत मिळण्यास मदत झाली आहे. हे पैसे काहींना अंशत: तर काहींना पूर्णपणे परत मिळाले आहेत. अशी माहिती सायबर सेल डेप्युटी कमिशनर Anyesh Roy यांनी दिली आहे.

सरकार कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ऑनलाईन फसवणूकी बाबत जागृत राहण्यासाठी 155260 वर कॉल केल्यानंतर 7-8 मिनिटांत पैसे परत मिळण्यामध्ये मदत मिळू शकते. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार मिळाल्यानंतर त्याचे डिटेल्स तपासले जातात. पैसे कोणत्या खात्यातून, आयडीवरून ट्रान्सफर करण्यात आले आहेत याची माहिती घेतली जाते. त्या माहितीनुसार, बॅंक किंवा ई साईट ला अलर्ट मेसेज पाठवला जातो. त्यानंतर रक्कम होल्ड केली जाते.

155260 या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, फ्रॉडची वेळ, बॅंकेचे अकाऊंट डिटेल्स यांची माहिती घेतली जाते त्यानंतर ते व्हेरिफाय केले जातं. तुमची माहिती पुढे कारवाईसाठी पोर्टल वर पाठवली जाते. संबंधित बॅंकेला देखील फ्रॉडची माहिती दिली जाते.