Tata Sky+ HD सेट बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना 4,999 रुपयांत खरेदी करता येणार
(Photo credit: Tata Sky)

टेलिकॉम कंपन्यांसह डीटीएच कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या युजर्ससाठी नव्या ऑफर्स आणल्या आहेत. ऐवढेच नाही तर युजर्सला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी डीटीएच कंपन्या त्यांच्या सेटअप बॉक्सच्या किंमतीत बदल करत आहेत. यामध्ये Tata Sky+ HD सेटअप बॉक्स याचा सुद्धा समावेश आहे.  कंपनीने पुन्हा एकदा सेटअप बॉक्सच्या किंमती कमी केल्या असून ग्राहकाला आता तो फक्त 4,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. यापूर्वी याची किंमत 7890 रुपयांऐवजी 5,999 रुपये करण्यात आली होती. परंतु आता टाटास्काचा एचडी सेटअप बॉक्स अधिकच स्वस्त झाला आहे. किंमतीत घट करण्यासह कंपनीने स्क्रिन सुद्धा रिडिझाईन केली आहे. (Vodafone Idea Loss: व्होडाफोन आयडियाचा नुकसानीचा सर्वात मोठा विक्रम; आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये तब्बल 73,878 कोटी रुपयांचा तोटा)

Tata Sky च्या वेबसाईट्सवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, Tata Sky+ HD सेटअप बॉक्सची किंमत आता 4,999 रुपये केली आहे. तसेच कंपनीने होम स्क्रिन मध्ये सुद्धा बदलाव केले आहेत. आता युजर्सला होम स्क्रिनवर चॅनल्स बद्दल माहिती आणि चॅनल सर्च करण्याचे ऑप्शन दिले जाणार आहे. यामध्ये टॉप चित्रपट आणि लाईव्ह स्पोर्ट्स कॅटेगरी यांचा ही समावेश करण्यात आला आहे.

Tata Sky+ HD सेटअप बॉक्समध्ये मिळणारे बेस्ट फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास युजर्सला यामध्ये त्यांच्या पसंदीचे टीव्ही आणि सिरीजचे रेकॉर्डिंग करता येणार आहे. तसेच मोबाईलच्या नेटवर्कचा वापर करुन सुद्धा आवडीचे कार्यक्रम रेकॉर्ड करु शकता. यासाठी ग्राहकाला mytatasky.com किंवा mytatasky अॅपचा वापर करावा लागणार आहे. Tata Sky+ HD सेटअप बॉक्समध्ये 3D Reddy फिचर्स दिले आहेत. (खाजगी डेटा सुरक्षेसाठी गुगल क्रोम एक्सटेंशन इन्स्टॉल करताना सतर्क राहण्याचा सायबर सुरक्षा एजेन्सीचा युजर्संना सल्ला)

अन्य फिचर्सबाबत सांगायचे झाल्यास Tata Sky+ HD सेटअप बॉक्समध्ये टॉप मुव्हिज यांच्या कॅटेगरीचा ही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांगला, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलगु अशा आठ भाषांमधील चित्रपट ग्राहकांना पाहता येणार आहेत. तसेच साउंड क्वालिटीसाठी डॉल्बी ऑडियोचा उपयोग करण्यात आला आहे.