TV  पाहायला सेट-टॉप बॉक्सची गरज नाही, Tata Sky Binge Fire TV Stick च्या मदतीने Rs 249 मध्ये पाहा तुमचे आवडते कार्यक्रम
(Photo credit: Tata Sky)

टीव्ही पाहायचा तर सेट टॉप बॉक्स हवाच. घराघरांतील टीव्ही जवळ सेट बॉक्स मोठ्या थाटात बसलेले असतात. पण, आता टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सची मुळीच गरज भासणार नाही. Tata Sky ने आता कार्यक्रमांवर आधारलेली फायर स्टिक टीवी लॉन्च केली आहे. ज्यामुळे टीव्ही पाहण्यासाठी सेट बॉक्सवरील ग्राहकांचे अवलंबित्व कमी होणार आहे. आपण Amazon Fire TV Stick च्या माध्यमातून Tata Sky Binge सेवा आरामात एन्जॉय करु शकता.

प्रतिमहिना Rs 249 इतके शुल्क

विशेष म्हणजे Airtel सुध्दा Amazon Fire TV Stick च्या माध्यमातून Amazon Fire TV Stick च्या माध्यमातून टीव्ही सेवेच्या माध्यमातून प्रीमियम कंटेंट देते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी Amazon Fire TV Stick चा TATA Sky एडिशन ग्राहकाला खरेदी करावे लागेल. ज्यासाठी प्रतिमहिना Rs 249 इतके शुल्क आहे.

प्रीमियम ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेमध्ये पाहा Hotstar, Eros Now, Sun NXT, Hungama

या सेवेच्या माध्यातून ग्राहकांना अनेक प्रकारच्या अॅप बेस्ड प्रीमियम कंटेटही अॅक्सेस करता येईल. यात प्रीमियम ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेमध्ये Hotstar, Eros Now, Sun NXT, Hungama यांसारखे अनेक व्हडिओ कार्यक्रमही पाहता येणार आहेत. Tata Sky Binge Fire Stick TV ची सेवा घेण्यासाठी आपण आपल्या LED किंवा LED स्मार्ट टीव्हीच्या HDMI पोर्टमध्ये याचा वापर करावा लागेल. Tata Sky Binge अॅप ला Amazon Fire TV Stick सोबत इंटिग्रेट करण्यात आले आहे. ज्यामुळे आपल्याला मध्ये Tata Sky Binge अॅप देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून यूजर्स कार्यक्रम पाहू शकतात. Tata Sky वरील कार्यक्रम पाहण्यासाठी सेट-टॉप बॉक्सची गरज भासणार नाही.

1,00,000 तासांचे कार्यक्रम

Tata Sky ने या सेवेच्या माध्यमातून VOD लायब्ररीही दिली आहे. ज्यात 5.000 टाईल्स दिल्या आहेत. या फायर स्टीक टीव्हीच्या माध्यमातून आपण 1,00,000 तासांचे कार्यक्रम दिले आहेत. यात आप हॉलिवूड, बॉलिवूड सोबतच स्थानिक कार्यक्रमही पाहू शकता. यासोबतच आपण लोकप्रिय टीव्ही मालिका आणि किड्स कार्यक्रमही पाहू शकता. या Amazon Fire TV Stick ममध्ये Tata Sky Binge अॅप देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून युजर्स कार्यक्रम पाहू सकतात.

Tata Sky Binge लॉन्च ऑफर

या फायर टीव्ही स्टीकसोबत यूजर्ससाठी लॉन्च ऑफरही ठेवण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना 3 महिन्यांसाठी Amazon Prime सब्सक्रिप्शन ऑफर उपलब्ध आहे. या टीव्ही स्टीकचा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला Amazon Fire TV Stick आफल्या टीव्हीसाठी जोडावी लागेल. त्यानंतर आपल्याला Tata Binge अॅपच्या सहाय्याने अॅप कार्यरत करावे लागेल. हे अॅप अॅक्टिवेट करण्यासाठी आपल्या टीव्ही स्किनवर Amazon Fire TV Stick कॉन्फीगर करण्यासाठी पर्याय उपलब्ध असेन. (हेही वाचा, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयापूर्वीच TATA SKY कडून चॅनल पॅकेजचे नवे दर जाहीर)

वाय-फाय कनेक्शन आवश्यक

दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्या घरी वाय-फाय कनेक्शन आहे. तर आपण ही सेवा सह घेऊ शकाता. ही सेवा घेण्यासाठी आपल्या जवळ Amazon अकाऊंट असणेही आवश्यक आहे. Amazon अकाऊंटवर लॉग-इन करताच आपण Tata Sky Binge अॅप डाऊनलोड करु शकता. अॅप डाऊनलोड केल्यानंतरच आपण ही प्रणाली कार्यकरत करु शकता. अॅपमध्ये Tata Sky ची आयडी OTP आणि ई-मेल आयडी नोंदवावा लागेल. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर तुम्ही सर्व कार्यक्रम आरामात पाहू शकता.