Surya Grahan December 2020: 14  डिसेंबरला यंदाच्या वर्षातलंं शेवटचं ग्रहण; पहा खग्रास सूर्यग्रहणाची वेळ काय?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

डिसेंबर महिना आला की जगभरात सेलिब्रेशनच्या तयारीला सुरूवात होते. यंदा डिसेंबर महिन्यात 2020 ला अलविदा म्हणत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही जसे सज्ज आहात तसाच हा महिना अवकाशप्रेमी आणि खगोलीय घटनांचा आनंद घेणार्‍यांसाठीदेखील खास आहे. 2020 ला अलविदा म्हणण्यापूर्वी यंदा त्यांना या वर्षातलं अखेरचं सूर्यग्रहण (Surya Grahan) देखील पहायला मिळणार आहे. खग्रास सूर्यग्रहण यंदा 14 डिसेंबरला आहे. भारतीयांना थेट त्याचा अनुभव घेता येणार नसला तरीही विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून तुम्हांला सहाजिकच सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

सूर्यग्रहणाचा काळ

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 15 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनी संपणार आहे. हे सुमारे 5 तास चालणारे ग्रहण असेल. खग्रास सूर्यग्रहणादरम्यान ते सर्वोच्च स्थानी रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी पोहचणार आहे. त्यामुळे सहाजिकाच भारतीयांना ते थेट अनुभवता येणार नाही. भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने सहाजिकच त्याचे अन्य ग्रहणाप्रमाणे नियम पाळण्याची देखील गरज नाही.

खग्रास सूर्य ग्रहणाची नेमकी स्थिती कशी असते?

जेव्हा सूर्य चंद्राच्या मागे झाकोळला जातो, तेव्हा निर्माण होणार्‍या ग्रहणाच्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणून ओळखलं जातं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणं वर्तुळाकार आकारात दिसतात. अंधश्रद्धेचा कळस! दिव्यांग मुलांना ग्रहणकाळात जमिनीखाली पुरले; 4 वर्षांची मुलगी बेशुद्ध.

14 डिसेंबरचं खग्रास सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, मॅक्सिको सौदी अरेबिया, कतार, सुमात्रा, मलेशिया, ओमान, सिंगापुर, नॉर्थन मरिना श्रीलंका मधून दिसणार आहे. सूर्यग्रहण दिसणार्‍या ठिकाणाहून ते अनुभवताना थेट डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी खास गॉगल्स वापर करावा अन्यथा डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.