Surya Grahan 2020 Free Live Streaming: भारतीय वेळेनुसार उद्या सूर्यग्रहण कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या
Representational Image (Photo Credits: File Image)

Solar Eclipse 2020 Live Online: देशात उद्या म्हणजेच 21 जून रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. देशातली काही भागातून हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपात तर काही भागात खंडग्रास ग्रहणाच्या स्वरूपात दिसून येईल. ग्रहण ही एक नैसर्गिक व खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका कक्षेत येतात आणि चंद्राची सावली सूर्यावर पडते तेव्हा ग्रहण दिसून येते. साहजिकच कधी तरी जुळून येणारा हा योग असल्याने आपल्यापैकी अनेकांना सुद्धा याबाबत उत्सुकता असेल. उद्या भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. प्राप्त माहितीनुसार 11 वाजून 37 मिनिटांनी ग्रहण अधिक स्पष्टपणे दिसून येईल. ही घटना पाहण्यासाठी घरातून बाहेर न पडता ऑनलाईन सुद्धा सोय करण्यात आली आहे. सूर्यग्रहण लाईव्ह कुठे पाहता येईल हे जाणून घ्या..

मुंबईत येत्या रविवारी किती वाजता दिसणार सूर्यग्रहण? जाणून घ्या ग्रहण पाहण्यासाठी कशी घ्यावी काळजी

तत्पूर्वी आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे सामान्यपणे सूर्य ग्रहणात वेध काळ, सुतक काळ हा ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. त्यामुळे उद्याच्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा सुतक काळ आज (20 जून) रात्री पासूनच सुरू होणार आहे. सूर्यग्रहण आणि त्यासंबंधीचे नियम तसेच ग्रहणाच्या सुतक काळाची वेळ इत्यादी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

इथे पहा लाईव्ह सूर्यग्रहण.

Surya Grahan 2020 Pregnancy Precautions: गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या काळात कोणती काळजी घ्यावी?

दरम्यान, ऑनलाईन सूर्यग्रहण पाहण्याचे मुख्य कारण असे की, सूर्यग्रहण थेट पाहिल्याने डोळ्यांना हानी पोहचू शकते, तसेच सध्या लॉक डाऊन सुरु असल्याने बाहेर पडून सूर्यग्रहण करताना कोरोनाचा धोका उद्भवू नये हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. तसेच मुंबई सह देशभरात अनेक ठिकाणी पावसामुळे काहीसे ढगाळ वातावरण असल्याने ग्रहण स्पष्ट दिसेलच असे सांगता येत नाही त्यापेक्षा एका जागी बसून केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सूर्यग्रहण आपण लाईव्ह पाहू शकाल.