Surya Grahan of June 21, 2020: मुंबईत येत्या रविवारी किती वाजता दिसणार सूर्यग्रहण? जाणून घ्या ग्रहण पाहण्यासाठी कशी घ्यावी काळजी
Surya Grahan 21 st June 2020 Mumbai Timings (Photo Credits: File Image)

Solar Eclipse June 2020: 21 जून रोजी भारताच्या काही भागत कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे. मुंबईत सुद्धा सकाळी 10 वाजल्यापासून ते 1.27 वाजेपर्यंत तीन तास सूर्यग्रहणाचा अवधी असेल. जसे की आपल्याला ठाऊक आहे की, सूर्य ग्रहण ही एक खगोलीय घटना असून अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत येतात तेव्हा ही घटना दिसून येते. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक ठरू शकते, लहान मुलांच्या तसेच चष्मा असणाऱ्यांच्या साठी तर याचा सर्वाधिक धोका असतो त्यामुळे ग्रहण पाहताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळेस 21 जून ला दिसणारे ग्रहण हे नेमके कोणत्या वेळी दिसणार आणि त्यावेळी आपण नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घ्या. Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय? या वेळेत काय कराल काय टाळाल?

मुंबईत किती वाजता दिसणार सूर्यग्रहण?

मुंबईत सूर्यग्रहण प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. 10 ते दुपारी 1  वाजून 27 मिनिटांपर्यंत ही परिस्थिती कायम असेल. सुमारे 3  तास 27 मिनिटांच्या कालावधीत 11 वाजून 37 मिनिटांनी ग्रहण अधिक स्पष्टपणे दिसून येईल. मुंबईसोबतच पुणे, नाशिक, नागपूर या मुख्य शहरात सुद्धा सुर्ग्रहणाची वेळ जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्याल?

- गॉगल लावणे चुकूनही विसरू नका.

- टेलिस्कोप सोलार फिल्टर्स लावावेत ज्यामुळे सूर्यकिरणे थेट आता येत नाहीत.

- ग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी घरीच रहावं.

-लहान मुलांना सोबत घेणार असाल तर त्यांच्यासाठी विशेष गॉगल घ्यावेत. तुमचे नेहमीचे गॉगल्स, सनग्लासेस वापरुन सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करु नका.

दरम्यान, 21 जून दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. या ग्रहण काळात गरोदर महिला, नवजात बालकं आणि नवमातांची विशेष काळजी घ्या.