Surya Grahan 2019: सूर्यग्रहणा दरम्यान अवकाशात दिसलंं 'रिंग ऑफ फायर' चं विलोभनीय दृश्य!
Surya Grahan 2019 | Photo Credits: Twitter/ ANI

Annular Solar Eclipse 2019: आज भारतासह दुबई, सिंगापूर मध्ये खगोलप्रेमींसाठी खास दिवस आहे. आजच्या दिवशी 2019 वर्षामधील शेवटचं ग्रहण पाहण्याची संधी आहे. काही ठिकाणी कंकणाकृती (Annular Solar Eclipse) तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी लोकांना मिळाली. दुबई प्रमाणेच दक्षिण भारतातील काही भागांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला मिळाले. जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire'असं म्हटलं जातं. Surya Grahan 2019: सूर्यग्रहण सुतक काळ संपल्यानंतर दोष टाळण्यासाठी अवश्य केल्या जातात 'या' गोष्टी!

दुबई मधील सूर्यग्रहणा दरम्यान 'रिंग़ ऑफ फायर' चं दृश्य

मदुराई येथील दृश्य  

मलेशिया मधील दृश्य

दक्षिण भारतामध्ये कोइम्बतूर,धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी,फाल्लकड, पायन्नूर,पोलची,पुडुकोटल,तिरूचीपल्ली,तिरूर येथे सुमारे 2-3 मिनिटं कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे तर उर्वरित भागात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. Surya Grahan 2019: ढगाळ वातावरणामुळे भारतामध्ये सूर्यग्रहण पाहण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता; कसा पाहाल हा अद्भूत नजारा.

आजचं सूर्यग्रहण सकाळी 8 ते 11 या वेळेदरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे सौरचष्मा वापरून थेट किंवा ऑनलाईन माध्यमातूनही सूर्याचं आज विलोभनीय दृश्य काही काळ अवकाशात पाहता येणार आहे.