Surya Grahan 2019: सूर्यग्रहण सुतक काळ संपल्यानंतर दोष टाळण्यासाठी अवश्य केल्या जातात 'या' गोष्टी!
Surya Grahan 2019 | Photo Credits: Twitter/ ANI

आज (26 डिसेंबर) यंदाच्या वर्षामधील शेवटचं ग्रहण अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. दरम्यान भारतामध्ये काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. ग्रहण ही सामान्य खगोलीय स्थिती असली तरीही याबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. अंधश्रद्धा आहेत. आज 21 व्या शतकामध्येही पौराणिक आणि धार्मिक मान्यतांनुसार ग्रहणाच्या वेळेपूर्वी विशिष्ट तासांपासून ग्रहणाचे वेध किंवा सुतक काळ पाळला जातो. ही वेळ अनिष्ट समजली जाते. त्यामुळे या काळात मंदिरं बंद ठेवली जातात. तुमच्या घरामध्येही ग्रहणाचा सुतक काळ पाळला जात असेल तर पहा आज ग्रहण संपल्यानंतर नेमकं काय कराल?

आजचे सूर्यग्रहण हे सकाळी 8 ते 11 या वेळेत मुंबईसह देशभरातील अनेक भागात दिसणार आहे. प्रामुख्याने आजारी आबालवृद्ध, नवजात बालकं आणि गर्भवती स्त्रिया यांना ग्रहणाच्या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. Surya Grahan Dec 2019 Live Streaming: 26 डिसेंबरचं कंकणाकृती सूर्यग्रहण ऑनलाईन कसं आणि कुठे पहाल?

  • ग्रहण संपल्यानंतर घरामध्ये गंगाजल किंवा गोमुत्र शिंपडून घर स्वच्छ केलं जाते. सोबतच घरातील केरकचरा काढून फरशी पुन्हा स्वच्छ पुसावी. यामुळे जर काही नकारात्मकता असल्यास ती दूर होते.
  • ग्रहणानंतर शक्य असल्यास पुन्हा आंघोळ करावी. त्यानंतर घरातील देवघरातील सार्‍या देवतांना स्वच्छ करून पुजा, प्रार्थना केली जाते.
  • घरामध्ये धूप करून घरातील प्रत्येक काना-कोपर्‍यामध्ये फिरवून प्रार्थना करण्याची प्रथा आहे.
  • ग्रहणानंतर ब्राम्हणांना दक्षिणा आणि अन्नदान दिले जाते.
  • ग्रामीण भारतामध्ये ग्रहण संपल्यानंतर नदीमध्ये डुबकी मारण्याची प्रथा आहे.

यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. आज कंकणाकृती स्थिती विशिष्ट भागातूनच दिसणार आहे. त्यामुळे त्याचा आनंद ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहे.