Strawberry Moon 2022 | PC: Twitter

Strawberry Supermoon 2022: जगभरातील अनेक देशांमध्ये 14 जूनच्या रात्री आकाशात एक अद्भुत दृश्य पाहिले. या दिवशी आकाशात पूर्णाकृती चंद्र मोठ्या आकारात (Full Moon) आणि काहीसा गुलाबी रंगात (Full Pink Moon 2022) दिसला याला स्ट्रॉबेरी मून (Strawberry Moon) असेही म्हटले जाते. मंगळवारी रात्री (14 जून 2022) पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. अशा वेळी चंद्र पहिल्या पेक्षा अधिक ठळक आणि विशेष सुंदर दिसला.

पूर्णाकृती आणि मोठ्या आकारात चंद्र तेव्हाच दिसतो जेव्हा तो पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. अवकाश संशोधकांनी दिलेली माहिती आणि केलेल्या नोंदीनुसार या वेळी चंद्र पृथ्वीच्या 222,238 मैल अंतरावर आला होता. ही सरकाररी चंद्राय्या आगोदरच्या तुलनेत 16,000 मैलांपेक्षा काहीशी अधिक जवळ आहे. विशेष म्हणजे या वेळी पूर्ण रात्रभर चंद्र नेहमीच्या तुलनेत 10% अधिक चमकदार दिसला. भारतातील नागरिकांनी हा नजारा सामान्य नजरेने म्हणजेच कोणतेही इतर उपकरण न वापरता पाहिला. (हेही वाचा, Strawberry Supermoon 2022 in India Live Streaming Online: आज पौर्णिमेचा चंद्र 'स्ट्रॉबेरी सुपरमून'; पहा कुठे, कसा, कधी पहाल?)

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

भारतामध्ये हा स्ट्रॉबेरी मून मंगळवारी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) 5:22 PM वाजता पाहायला मिळाला. ज्यानंतर जगभरातील लोकही याै चंद्राच्या खास प्रतिमा सोशल मीडयावर शेअर करत आहेत. इथे आपण पाहू शकता 'स्ट्रॉबेरी मून' (Strawberry Moon) काही प्रतिमा आणि व्हिडिओ. इथे दिलेला व्हिडिओ मुंबईतील असल्याचे सांगितले जाते आहे.

ट्विट

दरम्यान, नावावरुनच लक्षात येते की स्ट्रॉबेरी मून हा गुलाबी रंगाचा नाही. जून महिन्याच्या पोर्णिमेत 'स्‍ट्रॉबेरी मून' हे नाव अमेरिकेतील एका समूहाने दिले आहे. सांगितले जाते की, या नावाचा वापर अल्गोंक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा द्वारा करण्यात आला आहे. आमच्या देशात याला पौर्णिमा म्हटले जाते.