इस्रोने (Indian Space Research Organisation) टेक्नॉलॉजीच्या जगात नेहमीच यश मिळवले आहे हे सर्वांनाच माहिती आहे. याच पार्श्वभुमीवर इस्रोकडून आंतराळात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. तर आज श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन (Sathish Dhawan) अवकाश केंद्रातून पीएसएलवी-सी 50 ने (ISRO PSLV-C50 Rocket) यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. त्याअंतर्गत संप्रेषण उपग्रह सीएमएस-01 (CMS-01) ते आंतराळात पाठवण्यात आला आहे.(Jupiter and Saturn ‘Great’ Conjunction 2020 NASA Live Streaming: ख्रिसमस स्टारच्या रूपाने एकत्र येणार ज्युपिटर आणि शनी; जाणून घ्या कुठे पाहाल ही अवकाशीय घटना)
ही प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्याचसोबत सीएमएस-01 देशातील 42 वा संप्रेषण उपग्रह असल्याचे सांगितले जात आहे. याच्या लॉन्चिंगबद्दल सकाळपासून चर्चा सुरु झाल्या होत्या. यामुळे टेलिकम्युनिकेशन सेवा आणि पिक्चर क्विलिटी मध्ये सुधारणा दिसून येणार आहे.(NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश; पहिल्यांदाच International Space Station मध्ये उगवण्यात आला 'मुळा' Watch Video)
Tweet:
#PSLVC50 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota#ISRO #CMS01 pic.twitter.com/9uCQIHIapo
— ISRO (@isro) December 17, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या काळातील इस्रोचे हे दुसरे मिशन आहे. हा संप्रेषण उपग्रह एक्सटेंडेड सी बँड सेवा देणार असल्याचे लक्षात घेता तयार करण्यात आला आहे. याच्या लॉन्चिंगच्या योग्य वेळेची इस्रोकडून वाट पाहिली जात होती. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीत दोन वादळे आली होती. सीएमएस-01 चे आजीवन वर्षांचे असेल.